पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 07:51 IST2025-10-30T07:50:04+5:302025-10-30T07:51:53+5:30
नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पतीने आपल्या लहान मुलासमोर आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरात पतीने आपल्या लहान मुलासमोर आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. आधी गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिच्या चेहऱ्याला गंभीर जखमा केल्या. मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि कायदेशीर कारवाई सुरू केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राधेश्याम राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पती, सासू, नणंद आणि काका या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. ही घटना नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरातील तुलसीपूर माझा गावात घडली.
गळा दाबून हत्या
गोंडाच्या नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलसीपूर माझा येथील रहिवासी मुकेश यादव याने २०२३ मध्ये २३ वर्षीय सुषमाशी लग्न केले. लग्नापासूनच सुषमाचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक राधे श्याम राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश यादवने त्याच्या पत्नीची उसाच्या शेतात गळा दाबून हत्या केली आणि तिच्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला रॉडने मारहाण केली. त्यानंतर अपघाताची खोटी तक्रार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी पती मुकेश यादवला अटक
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने सखोल चौकशीनंतर आरोपी पती मुकेश यादवला अटक केली. महिलेचा भाऊ वीर प्रताप यांनी आरोपी पती मुकेश आणि इतर तीन जणांविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करून कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला.