११ वर्षे लहान भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी; नवऱ्यासह २ मुलांना सोडलं, मोडला संसार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:38 IST2026-02-04T12:36:31+5:302026-02-04T12:38:19+5:30

३० वर्षीय मामी प्रेमात वेडी झाली आहे, आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून ११ वर्ष लहान असलेल्या भाच्यासोबत पळ काढला.

gonda aunt fell in love with her nephew leaving behind her husband and two children | ११ वर्षे लहान भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी; नवऱ्यासह २ मुलांना सोडलं, मोडला संसार अन्...

फोटो - ndtv.in

उत्तर प्रदेशातील गोंडा येथील ३० वर्षीय मामी प्रेमात वेडी झाली आहे, आपल्या दोन मुलांना आणि पतीला सोडून ११ वर्ष लहान असलेल्या भाच्यासोबत पळ काढला. या दोघांमधील प्रेमाची ओढ इतकी टोकाची होती की, मामीने एकदा गळफास लावून जीव देण्याचाही प्रयत्न केला होता. सध्या या मामी-भाच्याच्या प्रेमप्रकरणाची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली आहे. ही घटना गोंडा येथील इटियाथोक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परना गावातील आहे. 

दद्दन तिवारी हा व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर आहे. चंदीगडमध्ये असताना दद्दनची भेट मनीषाशी झाली होती. तो मनीषाच्या घरी भाड्याने राहत होता. २०१७ मध्ये त्या दोघांनी गोंडामध्ये येऊन कोर्ट मॅरेज केलं. त्यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा नऊ वर्षांचा तर धाकटा चार वर्षांचा आहे. मनीषाची भेट भाचा विनीतशी झाली. विनीतने दहावीनंतर शिक्षण सोडलं होतं, त्याचे वडील अरुण दीक्षित रेशनचं दुकान चालवतात. विनीतचे दद्दनच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. याच दरम्यान मनीषा आणि विनीत एकमेकांच्या जवळ आले आणि चोरून भेटीगाठी सुरू झाल्या.

भाच्यासोबत राहण्याच्या जिद्दीवर ठाम 

जेव्हा दद्दनला या प्रकरणाची कुणकुण लागली, तेव्हा त्याने मनीषाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. दोघेही सोबत राहण्याच्या जिद्दीवर ठाम होते. पतीने विरोध केला तेव्हा दोन महिन्यांपूर्वी मनीषाने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. मात्र नातेवाईकांनी मध्यस्थी करून तिला वाचवलं. दुसरीकडे विनीतनेही स्वतःचं ठरलेलं लग्न मोडलं होतं.

प्रकरण पोहोचले पोलीस ठाण्यात 

नातेवाईकांनी या दोघांची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकायला तयार नव्हते. अखेर मंगळवारी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. तिथेही मामी आणि भाचा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. मनीषाने विनीतसोबतच राहण्याचं ठरवलं आणि आपल्या प्रेमासाठी पोटच्या दोन मुलांनाही सोडलं. मनीषाने पोलिसांना लेखी स्वरूपात दिलं की, तिचं विनीतवर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबतच राहायचं आहे. तिला तिची मुलं, पती आणि पतीच्या मालमत्तेशी काहीही देणेघेणं नाही. या लेखी जबाबानंतर पोलिसांनी तिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत जाण्याची परवानगी दिली.

Web Title : चाची ने भतीजे के साथ भागकर पति, बच्चों को छोड़ा।

Web Summary : उत्तर प्रदेश में एक 30 वर्षीय महिला अपने पति और दो बच्चों को छोड़कर 19 वर्षीय भतीजे के साथ भाग गई। परिवार के हस्तक्षेप और आत्महत्या के प्रयास के बावजूद, उसने उसके साथ रहने पर जोर दिया, यहां तक कि अपने बच्चों और पति की संपत्ति पर अपने अधिकार भी छोड़ दिए।

Web Title : Aunt elopes with nephew, leaving husband and children behind.

Web Summary : In Uttar Pradesh, a 30-year-old woman left her husband and two children for her 19-year-old nephew. Despite family intervention and a suicide attempt, she insisted on being with him, even giving up her rights to her children and husband's property.