विदेशातून आलेले आठ कोटींचे सोने जप्त; डीआरआयची कामगिरी, ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 06:06 AM2023-11-03T06:06:44+5:302023-11-03T06:07:20+5:30

३१ ऑक्टोबरला आरोपीच्या घरी छापा मारण्यात आला

Gold worth eight crores seized from abroad; DRI performance, 5 people arrested | विदेशातून आलेले आठ कोटींचे सोने जप्त; डीआरआयची कामगिरी, ५ जणांना अटक

विदेशातून आलेले आठ कोटींचे सोने जप्त; डीआरआयची कामगिरी, ५ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने विदेशातून तस्करीच्या सोन्याची वाहतूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी साडेआठ कोटी रुपये किमतीचे १३ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये डीआरआयने कारवाई करून ११ जणांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यांच्या ताब्यातून ३१ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. त्याची किंमत १९ कोटी रुपये होती. पुढे याच चौकशीतून डीआरआय मुंबईच्या पथकाने पुण्याजवळ बसमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांवर अटकेची कारवाई केली. ३० ऑक्टोबरला त्यांच्या ताब्यातून पाच किलो सोने जप्त करण्यात आले. 

१३ किलो ७०० ग्रॅम

  • सांगली जिल्ह्यातील एका आरोपीचा सहभाग समोर येताच, ३१ ऑक्टोबरला आरोपीच्या घरी छापा मारण्यात आला. त्यात वाराणसीहून नागपूरला दोघेजण सोने घेऊन येणार असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांना समजले. 
  • त्यानुसार, वाराणसी येथील डीआरआयच्या स्थानिक पथकाच्या मदतीने कारवाई करून आठ किलो ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. याप्रकरणी सोने नागपूरला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक केली. 
  • याप्रकरणी आतापर्यंत १३ किलो ७०० ग्रॅम तिघांना मुंबईतून तर दोघांना वाराणसीतून डीआरआयने अटक केली. याप्रकरणी अधिक तपास करत अन्य साथीदारांचा शोध सुरु आहे.

Web Title: Gold worth eight crores seized from abroad; DRI performance, 5 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.