बालेवाडी स्टेडियमजवळ सोनसाखळी हिसकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 16:45 IST2018-11-19T16:45:25+5:302018-11-19T16:45:34+5:30

बालेवाडीतील क्रीडा संकुलात कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या इसमाची ६५ हजार रूपये किंमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली.

Gold chain snatched near Balewadi stadium | बालेवाडी स्टेडियमजवळ सोनसाखळी हिसकावली

बालेवाडी स्टेडियमजवळ सोनसाखळी हिसकावली

पिंपरी : बालेवाडीतील क्रीडा संकुलात कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी गेलेल्या इसमाची ६५ हजार रूपये किंमतीची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावली. हिंजवडी पोलिसांकडे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


                     पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परसराम नारायण सोनी (वय ५७, रा. वाकड) असे फिर्यादीचे नाव आहे. कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी ते बालेवाडीला गेले होते. स्टेडियमच्या प्रवेशव्दारातून आत जात असताना, गर्दीत शिरलेल्या चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. आरडा ओरडा करेपर्यंत चोरटे तेथून पसार झाले. सुमारे ६५ हजार रूपये किंमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी हिसकावल्याची फिर्याद हिंजवडी पोलिसांकडे दाखल झाली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कुरकुटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Gold chain snatched near Balewadi stadium