जय अंबे मंदिरात दानपेटीसह सोन्य-चांदीच्या मुर्त्या असा सव्वा लाखाचा ऐवज चोरीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 19:22 IST2021-06-10T19:22:08+5:302021-06-10T19:22:56+5:30
Crime News : याप्रकाराने संताप व्यक्त होत असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

जय अंबे मंदिरात दानपेटीसह सोन्य-चांदीच्या मुर्त्या असा सव्वा लाखाचा ऐवज चोरीस
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ कुर्ला कॅम्प येथील जय अंबे मंदिरात दानपेटीसह सोन्या चांदीच्या मुर्त्या असा सव्वा लाखाचा ऐवज बुधवारी चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकाराने संताप व्यक्त होत असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कुर्ला कॅम्प काली माता मंदिरा मागे जय अंबे मंदिर असून बुधवारी दिवसा अज्ञात चोरट्याने ४० ग्राम सोन्या चांदीच्या मुर्त्या, रोख रक्कम व इतर वस्तूसह दानपेटी अशी एकून सव्वा लाखाची चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला. मंदिरात चोरी झाल्याने परिसरातून नाराजीचा सूर उमटत असून चोरांला अटक करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.