Goa police arrested software engineer with cannabis | सॉफ्टवेअर इंजिनियराला गांजासह गोवा पोलिसांनी केली अटक

सॉफ्टवेअर इंजिनियराला गांजासह गोवा पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देआशिष शर्मा (२६) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडे १ लाख २0 हजार रुपये किंमतीचा गांजा सापडला. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम २0 (ब), (अ) अंतर्गंत आशिष याच्यावर काणकोण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मडगाव : गोव्यात आज शुक्रवारी एका सॉफ्टवेअर अभियंत्याला गांजासह पकडण्यात आले. आशिष शर्मा (२६) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडे १ लाख २0 हजार रुपये किंमतीचा गांजा सापडला. संशयित मूळ उत्तर प्रदेश राज्यातील आहे. चेन्नई येथील एका कंपनीत तो कामाला असून, सदया लॉकडाउनमुळे तो गोव्याहून आॅनलाईन काम करीत होता अशी माहिती दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली.


राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील व्होवरे पाळोळे येथे एक कपेलजवळ काणकोण पोलिसांनी आशिषला ताब्यात घेउन झडती घेतली असता त्याच्याकडे ६0 ग्राम गांजा सापडला. नंतर त्याला रितसर अटक करण्यात आली. अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा कलम २0 (ब), (अ) अंतर्गंत आशिष याच्यावर काणकोण पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण पुढील तपास करीत आहे.

 

 

Web Title: Goa police arrested software engineer with cannabis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.