शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

बालिकेचा डबक्यात पडून मृत्यू की घातपात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 8:11 PM

कामठी तालुक्यातील शिरपूर शिवारात वीटभट्टीच्या डबक्यात पडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेच्या आईने बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्याने याप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या शिरपूर वीटभट्टी येथील घटनामुलीच्या आईची अत्याचाराची तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : कामठी तालुक्यातील शिरपूर शिवारात वीटभट्टीच्या डबक्यात पडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. डुकेश्वरी वसंत सहाणे असे मृत बालिकेचे नाव आहे. सोमवारी (दि.१८) नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. इकडे बालिकेच्या आईने बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्याने याप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.प्राप्त माहितीनुसार मृत बालिका डुकेश्वरी वसंत सहाणे ही मूळची छत्तीसगड राज्यातील इगतपुरी येथील राहणारी आहे. मोलमजूरी करणाऱ्या आईवडिलांसह गत सोमवारी कामठी तालुक्यातील शिरपूर येथील राजू जुगले यांच्या वीटभट्टीवर काम करण्यासाठी सहाणे कुटुंब आले होते. आईवडील कामात असताना अडीच वर्षीय लहान भाऊ तोषण सोबत डुकेश्वरी खेळत होती. सोमवारी दुपारी १२ वाजता दरम्यान डुकेश्वरी आईकडे धावत जाऊन मातीचे बाहुले बनवून मागण्याची जिद्द करू लागली. यावेळी तिची आई कामात असल्याने ती खेळता खेळता दूर गेली. मात्र बराच वेळ होऊन ती परत न आल्याने आई लक्ष्मी व वडील वसंत यांनी तिचा शोध घेतला. बराच वेळ होऊन तिचा शोध न लागल्याने आईवडिलांची धाकधूक वाढली. यातच वीटभट्ट मालक राजू जुगले यांनी कदाचित नजीकच्या डबक्यात पडली असावी असा अंदाज व्यक्त केला. यानंतर वसंत यांनी येथील पाण्याच्या डबक्यात पाहणी केली असता डुकेश्वरीचा मृतदेह तिथे दिसून आला. यावेळी पोलीस कार्यवाही तसेच वैद्यकीय शवविच्छेदन प्रक्रिया टाळण्यासाठी राजू जुगले यांच्या सल्ल्यावरून बालिकेचा मृतदेह कंत्राटी जागेतील मोकळ्या जागेत पुरुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर या प्रकरणाची अधिक चर्चा होऊ नये म्हणून राजू जुगले यांनी मृत बालिकेच्या आईवडिलांना दहा हजार रुपयाची मदत देत त्यांच्या मूळ गावी जाण्यास सांगितले. यानंतर जुगले यांनी त्यांना इतवारी रेल्वे स्टेशनपर्यंत आणून दिले.आई पुन्हा परतली...वीटभट्टी मालकाने इतवारी रेल्वे स्थानकावर आणून दिल्यानंतर मृत बालिकेची आई लक्ष्मी यांना मुलीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे तिने पतीसह इतवारी येथून शांतिनगर पोलीस स्टेशन गाठले. मात्र या प्रकरणाचे घटनास्थळ कामठी पोलीस स्टेशन येत असल्याने ते सोमवारी रात्री कामठीत दाखल झाले. यानंतर त्यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष बकाल यांची भेट घेत झालेल्या प्रकार सांगत मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार नोंदविली.पुरलेला मृतदेह बाहेर काढला 

मुलीच्या आईच्या तक्रारीची दखल घेत मंगळवारी नवीन कामठी पोलीस शिरपूर येथील घटनास्थळी दाखल झाले. तिथे दुपारी १२ वाजता पंचाच्या उपस्थितीत बालिकेचा जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे, पोलीस निरीक्षक संतोष बकाल, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाघमारे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्ता हैदरी यावेळी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो रुग्णालयातील न्यायवैद्यकीय विभागात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.वीटभट्टी मालक आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद !वीटभट्टी मालक राजू जुगले यांनी या प्रकरणाची बालिकेच्या आईवडिलांना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू न देण्याचा सल्ला दिला होता. असा सल्ला का देण्यात आला, याचा तपास होणे आवश्यक आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर बालिकेच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. मात्र घटना होऊन दोन दिवसाचा कालावधी झाल्यानंतरही पोलिसांनीही ही घटना का लपवून ठेवली, याबाबत परिसरात विविध चर्चा केल्या जात आहे. नवीन कामठी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर