अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:00 IST2025-12-13T12:59:51+5:302025-12-13T13:00:51+5:30
दिल्लीहून एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे पोहोचली. या दोघांची मैत्री इन्स्टाग्रामवर झाली होती.

फोटो - tv9hindi
दिल्लीहून एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे पोहोचली. या दोघांची मैत्री इन्स्टाग्रामवर झाली होती. त्यानंतर दोघांनी भेटण्याचा बेत आखला. जेव्हा तरुणी प्रियकराला भेटायला पोहोचली, तेव्हा दोघेही एकमेकांना पाहून खूश झाले, पण जेव्हा प्रेयसीने प्रियकराला लग्नासाठी विचारलं, तेव्हा तिला जे उत्तर मिळालं त्यामुळे तिने विषप्राशन करून स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला.
कोतवाली क्षेत्रातील कहारो परिसरात ही घटना समोर आली आहे. या भागात राहणाऱ्या करण वर्मा याने दिल्लीतील पश्चिम विहारमध्ये राहणाऱ्या एका मुस्लिम तरुणीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. त्यानंतर लग्नाचं आश्वासन देऊन त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. मुलगी आपलं घर सोडून दिल्लीहून रायबरेलीला पोहोचली आणि मुलाला भेटायला गेली. दोघांची भेट झाली, पण मुलाने लग्नास नकार दिला, त्यामुळे तिने आपला जीव देण्याचा प्रयत्न केला.
करण वर्माची त्या मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली होती. हळूहळू या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी भेटण्याचा बेत आखला. प्रियकराने प्रेयसीला लग्नाचं वचन दिलं होतं. प्रेयसी मुलाच्या बोलण्याला फसली आणि दिल्लीहून ५०० किलोमीटर दूर असलेल्या आपल्या प्रियकराला भेटायला रायबरेली येथे पोहोचली. प्रेयसीला पाहून प्रियकर खूश झाला, पण जेव्हा प्रेयसीने लग्नाची गोष्ट काढली, तेव्हा प्रियकराने स्पष्टपणे नकार दिला.
प्रियकराने लग्नास नकार देताच प्रेयसी पूर्णपणे खचली आणि या गोष्टीमुळे तिने विष प्राशन केलं. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. जिल्हा रुग्णालयाचे ईएमओ (EMO) डॉ. आतिफ यांनी सांगितलं की, हे विषप्राशनचं प्रकरण आहे. २४ वर्षांच्या तरुणीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.