लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी विवाह जुळविल्याने प्रेयसीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 15:40 IST2018-12-05T15:37:38+5:302018-12-05T15:40:49+5:30

प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली.

Girlfriend suicides due to boy friend marriage other girls | लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी विवाह जुळविल्याने प्रेयसीची आत्महत्या 

लग्नाचे आमिष दाखवून दुसरीशी विवाह जुळविल्याने प्रेयसीची आत्महत्या 

ठळक मुद्देयाप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

पिंपरी : प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाह जुळविला. हे सहन न झाल्याने मानसिक धक्का बसलेल्या तरुणीने आत्महत्या केली. सांगवी येथे इमारतीवरून उडी मारून मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिने आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. ईश्वरी बाबूराव पोकळे (वय २२, रा. नयन गोविंद गार्डन, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत योगेश गोकुळ सोनावणे (रा. प्रिय अपार्टमेंट, सिडको, रामनगर, औरंगाबाद) असे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पुष्पा बाबूराव पोकळे (वय ५० , रा. पैठण, औरंगाबाद) यांनी सांगवीपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आरोपी सोनावणे याने ईश्वरीस लग्नाचे आमिष दाखविले. ते दोघही एकाच खोलीत राहत होते. आरोपी योगेश याने दुसऱ्याच मुलीसोबत विवाह ठरविला. याबाबत त्याने ईश्वरीला सांगितले. हा धक्का सहन न झाल्याने ईश्वरीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. सहायक निरीक्षक अलका सरग याबाबत अधिक तपास करीत आहे.

Web Title: Girlfriend suicides due to boy friend marriage other girls