कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या मुलीचा छतावरुन पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 19:37 IST2021-11-22T18:29:26+5:302021-11-22T19:37:14+5:30
Fall Down And Died : मुंब्र्यातील कौसा भागातील सैनिक नगर परीसरातील इब्राहिम मेन्शन या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील रुम नंबर १०४ मध्ये तीच्या मामाकडे मागील काही दिवसांपासून रहात होती.

कपडे वाळत घालण्यासाठी गेलेल्या मुलीचा छतावरुन पडून मृत्यू
मुंब्रा - कपडे वाळत घालण्यासाठी छतावर गेलेल्या १० वर्षाच्या मन्तसा खान या अल्पवयीन मुलीचा तोल जाऊन खाली पडल्यामुळे तीचा घटनास्थळावर मृत्यू झाला. ती मुंब्र्यातील कौसा भागातील सैनिक नगर परीसरातील इब्राहिम मेन्शन या इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील रुम नंबर १०४ मध्ये तीच्या मामाकडे मागील काही दिवसांपासून रहात होती.
सोमवारी दुपारी एक वाजता ती कपडे वाळत घालण्यासाठी छतावर गेली होती.त्यावेळी अचानक तिचा तोल गेल्यामुळे ती जमिनीवर कोसळली. त्यात तीचा घटनास्थळावर मृत्यू झाला.घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांनी तीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आप्तकालिन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.