लॉजवर नेऊन शीतपेयात मद्य देऊन तरुणीवर केला लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 22:04 IST2021-06-26T21:55:40+5:302021-06-26T22:04:30+5:30
Rape Case : हा घटनाक्रम नोव्हेंबर २०२० पासून घडला.

लॉजवर नेऊन शीतपेयात मद्य देऊन तरुणीवर केला लैंगिक अत्याचार
अमरावती : फेसबूकवर ओळख झालेल्या तरुणीला ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याची धमकी देऊन मूर्तिजापूर (जि. अकोला) येथील लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आला. हा घटनाक्रम नोव्हेंबर २०२० पासून घडला.
पोलीस सूत्रांनुसार, राजकुमार अवधूत जामनिक (३०, रा. टाकळी, ता. दर्यापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे मूर्तिजापूरला वास्तव्य आहे. अमरावतीच्या विलासनगरमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी भादंविचे कलम ३७६ (२) (एन), ३२८, ५०६ व इतर कलमान्वये शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविला. त्याने फेसबूकवर तरुणीशी ओळख करून घेतल्यानंतर अनेकदा फोनवर संवाद साधला. डिसेंबर महिन्यात तिला अमरावती मध्यवर्ती आगारात बोलावले. तेथे फोनवरील संभाषणाच्या क्लिप असल्याची धमकी देऊन तिला मूर्तिजापूर येथे येण्यास भाग पाडले. तेथे एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आसोरे करीत आहेत.