भावाचा अपघात झाल्याचं सांगत तरूणीवर केला अत्याचार, नंतर दोन मजली इमारतीवरून खाली फेकलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2022 12:46 IST2022-11-05T12:45:52+5:302022-11-05T12:46:11+5:30

Crime News : पीडित तरूणीने सांगितलं की, मी बाजारात जात होते. तेव्हा माझ्याजवळ इरफान नावाचा एक तरूण आला आणि त्याने सांगितलं की, तिच्या भावाचा अपघात झाला.

Girl was called and raped in the name of brothers accident thrown down from two Store building in bhilwara Rajasthan | भावाचा अपघात झाल्याचं सांगत तरूणीवर केला अत्याचार, नंतर दोन मजली इमारतीवरून खाली फेकलं...

भावाचा अपघात झाल्याचं सांगत तरूणीवर केला अत्याचार, नंतर दोन मजली इमारतीवरून खाली फेकलं...

Crime News : राजस्थानच्या भीलवाडा शहरात भावाच्या अपघाताची खोटी माहिती देऊन एका तरूणीला बोलवलं आणि तिच्यासोबत रेप करून तिला छताखाली फेकलं. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

पीडित तरूणीने सांगितलं की, मी बाजारात जात होते. तेव्हा माझ्याजवळ इरफान नावाचा एक तरूण आला आणि त्याने सांगितलं की, तिच्या भावाचा अपघात झाला. ती म्हणाली की, हे कारण सांगून आरोपीने तिला गाडीवर बसवलं आणि सुभाष नगरमध्ये पाण्याच्या प्लांटमध्ये घेऊन गेला.

तरूणीने सांगितलं की, जेव्हा मी त्याला विचारलं की, भाऊ कुठे आहे तर तो म्हणाला की, रूमच्या आत आहे आणि आत नेल्यावर त्याने माझ्यावर अत्याचार केला. तिने सांगितलं की, आरोपी इरफानने तिच्यासोबत बलात्कार केला.

पीडितेनुसार, जेव्हा ती ओरडली तेव्हा बाहेर लोक जमा झाले. ज्यानंतर तो तिला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला होता. त्यानंतर त्यानंतर त्याने दोन मजली इमारतीची खिडकी उघडली आणि तिला खाली फेकलं. तरूणीच्या हात आणि कंबरेवर मार लागला आहे. तिने सांगितलं की, ती आरोपींना आधी ओळखत नव्हती.

रेपच्या या घटनेबाबत तिने पोलिसांना सांगितलं की, इरफान नावाचा तरूण तिला भावाचा अपघात झाल्याचं सांगून घेऊन गेला आणि तिच्यासोबत रेप केला. पीडितेच्या आरोपाचं परीक्षण केलं जात आहे.  पीडितेच्या जबाबानंतर तिचं मेडिकल केलं जाईल त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.

Web Title: Girl was called and raped in the name of brothers accident thrown down from two Store building in bhilwara Rajasthan