माझ्यासमोर मुलीला मारून टाकले...गयामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 02:00 PM2022-06-19T14:00:53+5:302022-06-19T14:05:05+5:30

Murder After Rape :ज्यामध्ये दोन तरुणांनी 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Girl killed in front of me ... Murder after rape of 13 year old girl in Gaya | माझ्यासमोर मुलीला मारून टाकले...गयामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या

माझ्यासमोर मुलीला मारून टाकले...गयामध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या

googlenewsNext

गया : बिहारमधील गया येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रकरण उघड होऊ नये म्हणून पीडितेचा गळा आवळून खून करण्यात आला. इमामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गुरुवारी ही घटना घडली. ज्यामध्ये दोन तरुणांनी 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य शेतात कामाला गेले होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. ही बाब कुटुंबीयांना समजताच एकच खळबळ उडाली. मृत मुलीच्या वडिलांनी सांगितले की, कुटुंबातील सर्व सदस्य शेतात कामाला गेले होते. घरी परतत असताना एका जुन्या इमारतीतून एका मुलीच्या किंचाळण्याचा आवाज आला. लगेच त्या घरात पोहोचल्यावर तिथली अवस्था पाहून सगळेच थक्क झाले.

'मी माझ्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण...'
मुलीच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही पाहिले की, दोन तरुण माझ्या मुलीवर अत्याचार करत आहेत. मी आरडाओरडा करताच इतर ग्रामस्थही घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोन्ही तरुणांनी माझ्या मुलीचा टॉवेलने गळा आवळून खून केला आणि घटनास्थळावरून पळून गेले. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, मी माझ्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्या लोकांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. गावातील इतर लोक तेथे पोहोचताच आरोपींनी तेथून पळ काढला.

पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत
त्याचवेळी इमामगंज पोलिस स्टेशनचे स्टेशन प्रभारी नय्यर एजाज अहमद यांनी सांगितले की, शुक्रवारी पोस्टमॉर्टमनंतर मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. नातेवाइकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.

 

Web Title: Girl killed in front of me ... Murder after rape of 13 year old girl in Gaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.