अर्धा लिटर सॅनिटाईजर प्राशन करत मनगटाची नस कापून युवतीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 18:30 IST2021-05-04T18:25:06+5:302021-05-04T18:30:03+5:30
Suicide Case : बिटको रुग्णालयाच्या आवारात घडली घटना

अर्धा लिटर सॅनिटाईजर प्राशन करत मनगटाची नस कापून युवतीने केली आत्महत्या
नाशिक : बिटको रूग्णालयाच्या आवरात आपल्या आईला भेटायला आलेल्या एका वीस वर्षीय युवतीने सॅनिटाईजर प्राशन केले आणि दोन्ही हातांच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. जखमी युवतीचा उपचारादरम्यान सोमवारी (दि.3) खासगी रुग्णालयात मृत्यु झाला. शिवानी लक्ष्मण भुजबळ (२०, रा. आशेवाडी, ता. दिंडोरी) असे आत्महत्या करणार्या युवतीचे नाव आहे. रविवारी शिवानी ही बिटको रूग्णालयात आली होती.
सकाळी तीने रूग्णालयाच्या आवारात अर्ध्या लिटरची सॅनिटाईजरची बाटली रीती करत सॅनिटाईजरचे सेवन केले.. तसेच धारदार शस्त्राने दोन्ही मनगटावर वार करून घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे ती गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी शिवानी हिला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनतर तिच्या नातेवाईकांनी प्रकृती खालावल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान सोमवारी दुपारी तीला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. तिच्या अचानकपणे झालेल्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ही बातमी गावामध्ये समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावामध्ये गेल्या १० दिवसांत कोरोनाने घेतलेला हा सहावा बळी असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. गावामध्ये ग्रामसेवक नसून अतिरिक्त नाशिकरोड येथील बिटको कोविड सेंटरला भरती केले कार्यभार शेजारील गावचे ग्रामसेवक यांच्याकडे होते.
शनिवार, दिनांक १ मे रोजी पहाटे जया लक्ष्मण भुजबळ (५०) यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे नाशिकला हलविले. तेथे ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू आलेला आहे. त्यामुळे गावाकडे लक्ष दिले जात नाही. झाला. ही बातमी त्यांच्या बाधित असलेल्या मुलीला समजल्यानंतर तिला प्रचंड धक्का बसला या नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तरी कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नियुक्ती गावात करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.