बिअर बारच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून मुलीने केली आत्महत्या; डान्ससाठी केली जबरदस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 21:39 IST2021-12-13T21:38:20+5:302021-12-13T21:39:30+5:30
Suicide Case : बुद्ध विहारमध्ये राहणारी राखी तिच्या बहिणीसोबत नॉर्थ एक्स मॉलमधील बारमध्ये काम करायची. मिळालेल्या माहितीनुसार, राखीने बारच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली.

बिअर बारच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून मुलीने केली आत्महत्या; डान्ससाठी केली जबरदस्ती
दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिला कर्मचाऱ्याने बिअर बारच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. बारमालक बारमध्ये काम करणाऱ्या मुलीला जबरदस्तीने डान्स करायला लावत होता, त्यामुळे तिने चौथ्या मजल्यावरून उडी मारली, असा आरोप आहे. राखी असे मृत झालेल्या मुलीचे नाव असून ती २१ वर्षांची होती.
बुद्ध विहारमध्ये राहणारी राखी तिच्या बहिणीसोबत नॉर्थ एक्स मॉलमधील बारमध्ये काम करायची. मिळालेल्या माहितीनुसार, राखीने बारच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. जखमी राखीला तातडीने बीएसए रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि राखीच्या बहिणीचा जबाब नोंदवला. राखीच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की, बार मालक तिच्यावर सतत नाचण्यासाठी दबाव आणत होता आणि त्याच्यासोबत नाचण्यास भाग पाडले जात होते. यानंतर राखीने बार मालक आणि पार्टी आयोजकाशी वाद घालण्यास सुरुवात केली आणि तिने रागाच्या भरात चौथ्या मजल्यावरून उडी मारली.
अपघातामुळे मुलीचा हात झाला शरीरापासून वेगळा; हात बॅगेत घेऊन गाठलं हॉस्पिटल
या खळबळजनक घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी बारमध्ये आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे स्कॅनिंग सुरू केले आहे. डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. पार्टीत आलेले पाहुणे आणि कर्मचाऱ्यांची यादी तपासली जात असून आयोजकाची चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राखी स्वत:हून घसरून पडल्याचाही पोलिसांना संशय आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू असून अद्याप कोणीही अटकेत नाही.