मुलीने वडील आणि भावाला बनवला चहा, चहा पावडरच्या ठिकाणी टाकले उंदीर मारण्याच औषध अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:06 IST2023-01-04T16:57:27+5:302023-01-04T17:06:08+5:30

उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने घरी चहा बनवत असताना गडबडीत चहा पुडच्या ठिकाणी उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचे समोर आले आहे.

girl accidently puts rat poison in tea chandauli up | मुलीने वडील आणि भावाला बनवला चहा, चहा पावडरच्या ठिकाणी टाकले उंदीर मारण्याच औषध अन्...

मुलीने वडील आणि भावाला बनवला चहा, चहा पावडरच्या ठिकाणी टाकले उंदीर मारण्याच औषध अन्...

उत्तर प्रदेशमधील चंदौली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीने घरी चहा बनवत असताना गडबडीत चहा पुडच्या ठिकाणी उंदीर मारण्याचे औषध टाकल्याचे समोर आले आहे. हा चहा वडील आणि भावाने घेतल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

ही घटना चंदौली जिल्ह्यातील कांशीराम कॉलनीची आहे. येथे 38 वर्षीय राजधनी आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. 18 वर्षांचा गणेश आणि 12 वर्षांचा दिनेश या दोघांना चहा घ्यायचा होता, वडीलांनी मुलीला चहा करायला सांगितला. 

यानंतर मुलगी चहा करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. यावेळी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. मुलगी अंधारात चहा बनवू लागली. त्यामुळे तिने चुकून चहा पावडर ऐवजी उंदीर मारण्याचे औषध टाकले. चहाच्या रंगातही विशेष बदल झाला नाही. मुलीने तीन कपमध्ये विषयुक्त चहा ओतला आणि सर्वांना दिला. कुटुंबातील सर्वांनी हा चहा पिला.

देवेन भारती मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; सह आयुक्तांवर 'लक्ष' ठेवण्याची जबाबदारी

हे चहा पिल्यानंतर काही वेळाने या तिघांचीही तब्येत बिघडली. सर्वांना उलट्या होऊ लागल्या. यावेळी मुलीने आरडा ओरडा करुन शेजाऱ्यांना बोलावले. शेजारच्यांनी रुग्णालयात दाखल केले. सध्या या तिघांच्यावर उपचार सुरू आहेत. या तिघांची तब्येत चांगली आहे.  

Web Title: girl accidently puts rat poison in tea chandauli up