तरुणीचा विनयभंग करून प्रेमी युगलास टवाळखोरांची मारहाण; व्हायरल व्हिडीओने सर्वत्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 12:43 IST2020-01-31T12:43:08+5:302020-01-31T12:43:29+5:30

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत

girl abused and lovers beat up in Jalna; Anger everywhere due to viral video | तरुणीचा विनयभंग करून प्रेमी युगलास टवाळखोरांची मारहाण; व्हायरल व्हिडीओने सर्वत्र संताप

तरुणीचा विनयभंग करून प्रेमी युगलास टवाळखोरांची मारहाण; व्हायरल व्हिडीओने सर्वत्र संताप

जालना : तालुक्यातील गोंदेगाव शिवारात तलावाच्या काठी बसलेल्या प्रेमी युगलास काही टवाळखोरांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. टवाळखोरांनी तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

तालुक्यातील गोंदेगाव शिवारात आलेल्या प्रेमी युगुलास काही  मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी कारवाईचे आदेश दिले असून, पोलिसांनी शुक्रवारी मारहाण करणाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे.

जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारातील एका तळ्याजवळ बसलेल्या प्रेमी युगुलास तीन- चार दिवसांपूर्वी काहींनी मारहाण केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काहींनी हा व्हिडिओ पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना दिला. या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकानी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी  सुधीर खिराडकर यांनी पथकासह घटनास्थळाला भेट देऊन मारहाण करणाऱ्यांची  धरपकड सुरू केली आहे.

Web Title: girl abused and lovers beat up in Jalna; Anger everywhere due to viral video