शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! मंदिरात पाणी पिण्यासाठी आला म्हणून मुस्लीम मुलाला बेदम मारहाण, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 08:32 IST

Crime News : मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका मुस्लीम धर्मीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात पाणी पिण्यासाठी आलेल्या एका मुस्लीम धर्मीय मुलाला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलाला मारहाण करणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. आरोपीनेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा मारहाण करतानाचा व्हिडीओ शेअर झाला आहे. या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेऊन गाझियाबाद पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 

गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी एक पथक तयार केलं होतं. या प्रकरणात भागलपूरच्या गोपाळपूर पोलीस ठाणे हद्दीत एकाला अटक करण्यात आली. अश्वनीकुमार यादव याचा मुलगा श्रृंगी नंदन यादव याला मारहाणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपी एक संघटनेशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे. या व्हि़डीओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी श्रृंगी यादव एका मुलाला त्याचं आणि वडिलांचं नाव विचारताना दिसत आहे. मुलाच्या नावावरून तो मुस्लीम धर्मीय असल्याचं लक्षात येत आहे. 'तू मंदिरात प्रवेश केलासच कसा?' असा प्रश्न विचारत आरोपी मुलाला बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. तर ज्या मुलाला मारहाण करण्यात आली तो आपण 'पाणी पिण्यासाठी मंदिरात आलो होतो' असं उत्तर देतानाच मारहाण न करण्याची विनंती करताना दिसत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! चालत्या कारमध्ये तब्बल 12 जणांनी महिलेवर केला सामूहिक बलात्कार; Video व्हायरल

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. चालत्या कारमध्ये तब्बल 12 जणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालत्या कारमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी पीडितेला बोलावून घेत तक्रार दाखल करुन घेतली आणि याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली. ही घटना 6 महिन्यांपूर्वीची असल्याचं सांगितलं जात असून वेगवेगळ्या तीन कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार आणि मारहाण करण्यात आली आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMuslimमुस्लीमWaterपाणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक