हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 15:47 IST2025-07-29T15:47:07+5:302025-07-29T15:47:34+5:30
बनावट दूतावास प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
UP Crime: गाझियाबादमधील बनावट दूतावास प्रकरणाचा तपास युपी एसटीएफ करत आहे. हा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटचा सूत्रधार हर्षवर्धन जैन याने २२ शेल कंपन्या बनवल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यातील ५ कंपन्याची नावे चक्क Reliance शी मिळतीजुळती आहेत.
दरम्यान, हर्षवर्धनने फसवलेली दोन व्यक्ती समोर आले आहेत, ज्यांनी सांगितले की, परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांना आरोपीने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. दिल्लीतील एका तरुणाने इराकमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी हर्षवर्धन जैन याला ७ लाख रुपये दिले होते, तर उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने २ लाख रुपये दिले होते. या दोघांनी समोर येऊन रितसर तक्रार नोंदवली आहे.
हर्षवर्धन कसा फसवायचा?
उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (यूपी एसटीएफ) ने ही संपूर्ण फसवणूक उघडकीस आणली आहे. त्यांना माहिती मिळाली होती की, एक मोठे बनावट दूतावास रॅकेट सुरू आहे, ज्यामध्ये परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना फसवले जात आहे. तपासात असे दिसून आले की, हर्षवर्धन जैनने फक्त बनावट दूतावास उभारले नाही, तर अनेक शेल कंपन्यादेखील तयार केल्या. सरकारी आणि नामांकित खाजगी कंपन्यांसारखी नावे देऊन लोकांची दिशाभूल केली.
हर्षवर्धन जैन याने स्थापन केलेल्या २२ शेल कंपन्यांमध्ये रिलायन्सशी थेट मिळतीजुळती असलेली ५ नावे आहेत, जसे की-
Reliance Anil Dhirubhai Ambani Group
Reliance Big Pictures
Reliance PLC
Reliance Capital
Reliance Big Entertainment
इतर कंपन्या
EAST INDIA COMPANY UK LIMITED
LONDON ADVISORY LIMITED
LONDON ACQUISITIONS
LONDON COMMODITY EXCHANGE
RAMP (INDIA) LIMITED
JYOTI MARMO & GRANITE MAURITIUS
INDIRA OVERSEAS LIMITED
ISLAND GENERAL TRADING CO
JAIN ROLLING MILLS
INDIRA BUSINESS (INDIA) PRIVATE LIMITED
EMIRATES PETROLEUM PLC
MITTAL ISPAT PLC
SINDBAD THE TRADER PLC
RITZ BOULEVARD
STATE TRADING CORPORATION LIMITED
HINDUSTAN FERTILIZER CORPORATION LIMITED
आतापर्यंत २२ शेल कंपन्या ओळखल्या गेल्या
या व्यतिरिक्त, लंडन, मॉरिशस आणि भारतात नोंदणीकृत इतरे अनेक कंपन्या देखील तयार करण्यात आल्या, जेणेकरून आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार करता येईल. तपास संस्थांनी आतापर्यंत २२ शेल कंपन्या ओळखल्या आहेत, ज्याद्वारे हर्षवर्धन जैन याने नोकऱ्या, गुंतवणूक आणि व्यवसाय प्रस्तावांच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. या कंपन्यांद्वारे आंतरराष्ट्रीय मनी लाँड्रिंग आणि बनावट कागदपत्रांचे व्यवहार देखील चालत असल्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. सध्या एसटीएफ आणि इतर केंद्रीय संस्था संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या काळात आणखी खुलासे होऊ शकतात.