शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

'गे' कर्मचाऱ्याचा बॉसकडून छळ, सोशल मीडियावरून फोडली वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 3:36 PM

महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या प्रकरणाची दखल घेत आता एका त्रयस्थ अधिकाऱ्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

 

मुंबई - गे असल्याने आपल्याला बॉसने त्रासदायक वागणूक दिल्याचा आरोप टेक महिंद्रा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्याने केला आहे. गौरव प्रामाणिक असे  या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने त्याची बॉस रिचा गौतम हिच्यावर हे आरोप केले आहेत. रिचा गौतम सध्या टेक महिंद्रामध्ये डायव्हर्सिटी विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहते. गौरवच्या आरोपांनंतर अजून एका माजी कर्मचाऱ्याने रिचा ही मुस्लीम धर्माविरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही केला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, गौरवने या संदर्भात ट्विटरवर एक पत्र जाहीर केलं होतं. त्या पत्रात त्याने रिचाकडून झालेल्या छळाचा उल्लेख केला आहे. 2012पासून ते 2016पर्यंत गौरव महिंद्रामध्ये काम करत होता. त्यावेळी रिचा त्याच्या गे असण्यावरून आणि त्याच्या रंगीबेरंगी कपड्यांवरून जाहीरपणे टिंगलटवाळी करून गौरवला लज्जास्पद वागणूक देत असे. ती त्याचा उल्लेख बायक्या असा करत होती. ती तिच्या हाताखालच्या अनेकांना ती गौरवची टिंगल करण्यासाठी प्रात्साहन देत असल्याचा आरोप गौरवने या ट्विटमधील पत्रात केला आहे. या सगळ्याला वागणुकीला कंटाळून गौरवने 2016 मध्ये महिंद्रा कंपनीचा राजीनामा देत नोकरी सोडली. गौरवच्या या तक्रारीनंतर स्पंदन महंता या अजून एका कर्मचाऱ्याने रिचावर मुस्लीमांविरोधी वर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी या प्रकरणाची दखल घेत आता एका त्रयस्थ अधिकाऱ्याद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. कारण डायव्हर्सिटी विभागासोबत रिचा महिंद्रा कंपनीच्या अन्य समितीमंडळांवरही असल्याने ही चौकशी निष्पक्षपातीपणे होण्यासाठी त्रयस्थ अधिकारी नेमण्यात येणार आहेत. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMahindraमहिंद्रा