गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:32 IST2025-12-19T12:29:41+5:302025-12-19T12:32:13+5:30
क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या एका २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर बलात्कार करण्यात आला. तरुणीच्या मैत्रिणीने तिच्या मित्राला बोलावलं होतं. त्याने हॉटेलमध्ये राहण्याचा आग्रह केला आणि त्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या मित्रानेच तिच्यावर अत्याचार केला.

गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
ती मैत्रिणीसोबत क्रीडा स्पर्धेसाठी फरिदाबादला आली होती. २३ वर्षीय नेमबाज तरुणी स्पर्धा संपल्यानंतर मैत्रिणीसह पुन्हा घरी जाणार होती. पण, तिची मैत्रीण म्हणाली की, माझ्या मित्राला बोलावते, तो आपल्याला मेट्रो स्टेशनला सोडेल. पण, मित्र आला आणि तिच्यासोबत असं काही घडलं की आयुष्यभर विसरता येणार नाही. मैत्रिणीचा मित्र सोबत त्याच्या मित्राला घेऊन आला आणि त्यानेच तिच्यावर अत्याचार केला.
पीडित मुलगी भिवानीवरून मैत्रिणीसह फरिदाबादमध्ये आली होती. पण, मैत्रिणीनेच तिचा विश्वासघात केला.
मैत्रिणीने मित्राला बोलावलं...
फरिदाबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना पीडितेने दिलेल्या तक्रारीमध्ये सगळा घटनाक्रम सांगितला आहे.
पीडित नेमबाज तरुणी स्पर्धा संपल्यानंतर मैत्रिणीसह स्टेडियमवरून चालत मेट्रो स्टेशनपर्यंत चालत जाणार होती. पण, तिची मैत्रीण म्हणाली की, मी माझ्या मित्राला बोलावते. तो आपल्याला मेट्रो स्टेशनला नेऊन सोडेल.
मैत्रिणीने तिचा मित्र गौरवला कॉल केला. गौरव फरिदाबादमध्येच राहतो. कॉल केल्यानंतर अर्धा तासाने गौरव त्याचा एक मित्र सतेंद्रसह तिथे आला.
घरी पोहचायला उशीर होईल इथेच थांबा
गौरवने दोघींना मेट्रो स्टेशनवर सोडण्याऐवजी तिथेच राहण्याचा आग्रह केला. तो म्हणाला की, तुम्हाला भिवानीला पोहोचायला रात्री खूप उशीर होईल. त्यापेक्षा आज रात्री तुम्ही इथेच हॉटेलमध्ये रहा. गौरवने थांबण्याचा आग्रह केल्यामुळे दोघींनी भिवानीला जाणं टाळलं आणि एका हॉटेलमध्ये गेल्या.
हॉटेलमध्ये पार्टी, मैत्रीण गौरवसोबत बाहेर गेली अन्...
चौघांसाठी दोन रुम बुक केल्या. त्यानंतर गौरव त्यांना पार्टी करू म्हणाला. चौघांनी एका खोलीमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्य प्राशन केले. रात्री उशिरा तिची मैत्रीण गौरवसोबत बाहेर गेली.
गौरव आणि तिची मैत्रीण बाहेर गेल्यानंतर सतेंद्रने तिला पकडले आणि त्यानंतर अत्याचार केला. हा प्रकार घडल्याननंतर तरुणीने थेट पोलिसांना कॉल करून तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलीस हॉटेलवर दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तिची मैत्रीण, गौरव आणि सतेंद्र यांना अटक केली.