शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
3
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
4
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
5
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
6
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
7
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
8
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
9
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
10
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
11
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
12
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
13
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
14
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
15
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
16
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
17
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
18
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
19
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
20
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता

गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक, ८० हून अधिक तक्रारी, गुन्हे शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 6:20 AM

गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बुधवारी बिहारमध्ये अटक केली.

मुंबई : गँगस्टर एजाज लकडावाला याला मुंबई पोलिसांनी बुधवारी बिहारमध्ये अटक केली. एजाजची अटकेतील मुलगी शिफा हिच्या चौकशीतून तो येणार असल्याची माहिती मिळताच ही कारवाई झाली. दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एजाजने नंतर छोटा राजनच्या मदतीने टोळी तयार केली. राजनसह त्याने मलेशिया, केनिया, कॅनडा, स्वीत्झर्लंड व अरब देशांत प्रस्थ निर्माण केले. राजन व एजाजवर २००२ मध्ये बँकॉकमध्ये छोटा शकीलच्या हस्तकांनी गोळ्या झाडल्या होत्या. यात एजाज जखमी झाला होता. एजाज १९९२ ते २००८ पर्यंत छोटा राजन टोळीत होता. टोळीत आर्थिक खटके उडायला सुरुवात झाली. त्यामुळे एजाजने स्वत:ची टोळी सुरू केली.एजाजविरुद्ध मुंबईत खंडणी, हत्या, हत्येचा प्रयत्न आदी २५ गुन्हे नोंद असून ८०हून अधिक तक्रारी आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून लकडावाला खंडणीसाठी फोन करून धमकावत असे. सहा महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या मुलीला २७ डिसेंबर रोजी अटक झाली. बनावट पासपोर्टच्या आधारे ती नेपाळला पळून जात होती. एजाजला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बिहार पोलिसांच्या मदतीने अटक केली. तो बनावट पासपोर्टच्या आधारे बिहारमध्ये आला. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.>परदेशात मोठी संपत्तीलकडावाला याचे कॅनडा, युनायटेड किंग्डम, अमेरिका, मलेशिया, कंबोडिया, नेपाळ या देशांत वास्तव्य असून, यापैकी त्याची कॅनडा, मलेशिया व लंडनमध्ये संपत्ती असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. एजाजकडे दाऊदसंदर्भात बरीचशी माहिती असल्याच्या शक्यतेतून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या मुंबई व अन्य ठिकाणच्या साथीदारांचाही शोध सुरू आहे.