लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 08:49 IST2021-05-14T08:47:38+5:302021-05-14T08:49:56+5:30

धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पीडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

Gang rape of a minor girl on the pretext of marriage, arrest of three including boyfriend | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, प्रियकरासह तिघांना अटक

 
ठाणे :
एका १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आकाश कदम (वय २१) याच्यासह तिघांना वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. या तिघांनाही १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. पीडित मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे.

धर्मवीरनगरमध्ये राहणारा आरोपी आकाश याची आणि पीडित मुलगी यांची गेल्या एक वर्षभरापूर्वी ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून १२ ते १३ नोव्हेंबर २०२० रोजी त्याच्या घरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. नंतर तिच्या घरात हा प्रकार कोणाला समजू नये, यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने आकाशचा मित्र विकी ऊर्फ विकास करोतिया (वय २१), तसेच विकीचा मित्र सागर करोतिया (२६) यांनीही आकाशच्या घराजवळील परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

यातूनच ती चार महिन्यांची गरोदर राहिल्याने हा प्रकार समोर आला. त्यावेळी तिने आईला ही आपबिती सांगितली. कुटुंबीय रागावतील या भीतीने आपण हा प्रकार सांगितला नसल्याचेही तिने सांगितले. मुलीच्या आईने तातडीने याप्रकरणी १२ मे २०२१ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आणि सहायक पोलीस निरीक्षक शीतल चव्हाण यांच्या पथकाने आकाश याच्यासह तिघांनाही अटक केली.
 

Web Title: Gang rape of a minor girl on the pretext of marriage, arrest of three including boyfriend