धक्कादायक! मृतदेहावरचं कफन चोरून लोकांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 05:41 PM2021-05-09T17:41:49+5:302021-05-09T17:47:30+5:30

Gang busted who selling stolen shroud : चोरी केलेले कपडे धुवून पुन्हा चढ्या दराने विकायचे. पोलिसांनी छापा मारून त्या टोळीला पकडले.

Gang busted who selling stolen shroud from dead bodies in up baghpat seven arrested | धक्कादायक! मृतदेहावरचं कफन चोरून लोकांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ जणांना अटक

धक्कादायक! मृतदेहावरचं कफन चोरून लोकांना विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ जणांना अटक

googlenewsNext

कोरोनाकाळात माणुसकीला काळीमा फासत असलेल्या अनेक घटना समोर येत आहे. माणूस मेल्यानंतरही त्याचा फायदा कसा  करून घेता येईल अशा प्रवृत्तीचे लोक समाजात मोठ्या प्रमाणावर असल्याचं दिसून येत आहे. अशीच एक धक्कादायक माहिती उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. 

उत्तर प्रदेशच्या बागपतमधील स्मशानभूमीतून कपडे चोरून लोकांना विक्री करत असलेल्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या टोळीला बरौत पोलिस ठाण्यातील पथकानं अटक केली आहे. पोलिसांनी मास्टरमाइंडसह सात जणांना अटक केली. हे लोक स्मशानभूमीतून मृतदेहावर असलेल्या कफनाचे कापड चोरून न्यायचे. 

रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड; रुग्णालयातील वॉर्डबॉय निघाला आरोपी

यानंतर, चोरी केलेले कपडे धुवून पुन्हा चढ्या दराने विकायचे. पोलिसांनी छापा मारून त्या टोळीला पकडले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात चोरलेले कफनाचे कापड जप्त करण्यात आले आहे.  अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रवीण जैन, श्रीपाल जैन, आशीष जैन, उदित जैन, श्रवण कुमार, ऋषभ जैन, ईश्वर शर्मा  यांचा समावेश असून ते गुराना रोड बडौत येथील रहिवासी आहेत.

शॉक लागून बालकामगाराचा मृत्यू, रबाळे एमआयडीसी मधील घटना

पोलिस सध्या आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. दरम्यान मृतदेहाला स्मशानभूमीत नेण्यासाठी रुग्णावाहिका चालकांकडून अनेक ठिकाणी लोकांना लुबाडलं  जात आहे. कोरोनाकाळात लोकांच्या स्थितीचा फायदा घेत गुन्हेगार आपले खिसे भरताना दिसून येत आहेत. 

Web Title: Gang busted who selling stolen shroud from dead bodies in up baghpat seven arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.