वाहनांच्या काचा फोडून ऐवज चोरणारी टोळी जेरबंद; लॅपटॉपसह पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 08:50 PM2020-10-29T20:50:35+5:302020-10-29T20:55:28+5:30

चिंचवड परिसरात मागील दीड वर्षापासून २५ ते ३० वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉप, रोख रक्कम आणि इतर साहित्याची चोरी केल्याची कबुली..

Gang arrested who breaking glass of vehicles and theft ; Thirteen lakh worth ammount and laptops seized | वाहनांच्या काचा फोडून ऐवज चोरणारी टोळी जेरबंद; लॅपटॉपसह पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहनांच्या काचा फोडून ऐवज चोरणारी टोळी जेरबंद; लॅपटॉपसह पावणे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाची कारवाई या कारवाईमुळे १३ गुन्हे उघडकीस

पिंपरी : वाहनांच्या काचा फोडून चारचाकीमधून ऐवज चोरून नेणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून तब्बल १८ लॅपटॉप, तीन वायफाय डोंगल, एक कॅमरा लेन्स, सात लॅपटॉप बॅग, दोन दुचाकी असा एकूण १२ लाख ७७ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कारवाई केली. 

गणेश उर्फ नाना माणिक पवार (रा. नवी मुंबई), बबन काशिनाथ चव्हाण (वय ३९, रा. तिºहे तांडा, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), बसू जगदीश चव्हाण (वय ४५, रा. सुरक्षा नगर, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश प्रकाश चव्हाण (वय ३५, रा. अंबुजवाडी, मालवणी, मालाड, मुंबई), मारुती मानी पवार (वय ४०, रा. पाणी इपरगा तलाव, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर) हे त्यांचे साथीदार फरार आहेत. आरोपींनी चोरलेला माल विकत घेणाºयांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. अमोल साहेबराव गुंड (रा .शिवनी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर), सुलेमान याकुब तांबोळी (रा. विष्णू नगर, कुमठा नाका, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत.

हिंजवडी परिसरातून मिलिंद वेदव्यास राळेगावकर (वय ४८, रा. सुसगाव) यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून चोरट्यांनी ५० हजारांची बॅग चोरून नेली. ६ आॅक्टोबर रोजी घडलेल्या या प्रकाराबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक दुचाकी संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळली. पोलिसांनी शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्हीची तपासणी करून दुचाकीचा शोध घेतला. ती दुचाकी आरोपी गणेश याची असल्याचे निष्पन्न झाले. गणेश हा मुंबई पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याला रबाळे, नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. गणेश याने त्याच्या बबन आणि बसू या दोन साथीदारांची नावे सांगितली. पोलिसांनी दोघांना हडपसर आणि सोलापूर येथून ताब्यात घेतले. राजेश आणि मारुती या दोन साथीदारांसोबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मागील दीड वर्षापासून २५ ते ३० वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉप, रोख रक्कम आणि इतर साहित्याची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली.

पोलिसांनी चोरीचे सामान विकत घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १८ लॅपटॉप, तीन वायफाय डोंगल, एक कॅमेरा लेन्स, सात लॅपटॉप बॅग, दोन दुचाकी असा एकूण १२ लाख ७७ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चोरीचे काही लॅपटॉप फरार आरोपी राजेश आणि मारुती यांनी मुंबई येथे विकल्याचे सांगितले आहे. जप्त केलेल्या १८ लॅपटॉपपैकी सहा लॅपटॉपच्या मूळ मालकांचा शोध लागला आहे. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील सात, वाकड पोलीस ठाण्यातील तीन, बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एक आणि हडपसर पोलीस ठाण्यातील दोन असे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक केलेले तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

आरोपी गणेश याच्यावर मुंबई शहर येथे २४ गुन्हे दाखल आहेत. तो डिसेंबर २०१९ मध्ये त्याच्या इतर साथीदारांसोबत गोवा येथे वास्तव्यास होता. तिथेही त्याने अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. गोवा पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. आरोपी बसू चव्हाण याच्यावर मुंबई शहर आणि पुणे शहर येथे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. त्याला मुंबई शहरातून तडीपार करण्यात आले आहे. त्यानंतर त्याने आपले बस्तान पुणे शहरात बसवले. तर फरार आरोपी राजेश पवार आणि मारुती चव्हाण यांच्यावर अनुक्रमे २७ आणि ३ गुन्हे दाखल आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहाय्यक निरीक्षक अंबरीश देशमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवटे, पोलीस कर्मचारी प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मोहम्मद गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनील गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी, राजेंद्र शेटे, अतुल लोखंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title: Gang arrested who breaking glass of vehicles and theft ; Thirteen lakh worth ammount and laptops seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.