अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्या मामानं टाकली वाकडी नजर; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 15:46 IST2021-12-14T15:45:57+5:302021-12-14T15:46:32+5:30
Molestation Case : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागासवर्गीय कुटुंबातील १३ वर्षीय मुलगी शाळेत शिक्षण घेत असून तिची शाळेतील मामाच्या घरी राहणारी मैत्रीण अशा दोघी ट्युशनसाठी एक ठिकाणी दररोज एकत्र जात होत्या.

अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्या मामानं टाकली वाकडी नजर; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
भिवंडी - १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मैत्रिणीच्या मामाने विनयभंग केला असल्याची घटना भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात मैत्रिणीच्या मामा विरोधात विनायभंगासह पोक्सो व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम आरोपीस तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यास तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. निखिल सुदाम तारे (वय २५) असे अटक आरोपीचे नाव आहे .
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागासवर्गीय कुटुंबातील १३ वर्षीय मुलगी शाळेत शिक्षण घेत असून तिची शाळेतील मामाच्या घरी राहणारी मैत्रीण अशा दोघी ट्युशन साठी एक ठिकाणी दररोज एकत्र जात होत्या. मागच्या आठवड्यात ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पीडित मुलगी ट्युशनला जाताना आपल्या मैत्रिणीला सोबत घेण्यासाठी तिच्या मामाच्या घरात गेली असता पीडितेची मैत्रीण त्या ठिकाणी नसल्याचा गैरफायदा घेत मैत्रिणीचा मामा निखिल तारे याने पीडितेस एका खोलीत घेऊन खोलीचे दार आतून बंद करीत तिच्या शरीरावरुन हाथ फिरवला दरम्यान पीडितेने आरडाओरड केल्याने आरोपीने खोलीचे दार उघडताच पीडितेने आपली सुटका करीन घेत तेथून पळून गेली.
त्यानंतर मुलगी ट्युशनला जाऊन घरी आल्यावर रडत असल्याने आईवडिलांनी विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितल्या नंतर पीडितेच्या आईने भिवंडी तालुका पोलीस ठाणे येथे आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती देत तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी निखिल तारे या विरोधात विनयभंग पोस्को सह अट्रोसिटी कायद्यानव्ये गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. दरम्यान अत्याचाराच्या या घटनेचा सर्वच थरातून निषेध केला जात आहे .