शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

मित्रांनी तिसऱ्या मजल्यावरून ढकलून तरुणाचा घेतला जीव, पोलिसांनी असं उलगडलं गूढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 16:52 IST

Murder Case : या प्रकरणी पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या सह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे. 

जळगाव : जळगावातील हत्या प्रकरणाची उकल करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत मित्राची हत्या करण्यात आली. मित्रांनीच मित्राचा शेवट केल्याचा आरोप आहे. जळगावात गोलाणी मार्केटमध्ये ही खळबळजनक घटना घडली. तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून देत तरुणाची हत्या करण्यात आली होती. मुकेश राजापूर असे मृत युवकाचे नाव आहे. 

मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलत हत्या केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्याआधारे पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. जळगावातील तरुणाच्या कथित अपघाती मृत्यू प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उलगडले आहे. तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तरुणाची हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. मित्रांनीच तरुणाची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या सह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे. 

हत्या करुन मित्र स्वतः पोलीस ठाण्यात गेले होते. मुकेश इमारतीवरुन पडल्याची बतावणी करून पोलिसांना अपघात असल्याचे भासवले. मात्र, पोलिसांना या प्रकरणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार अपघात नसून हत्या असल्याचं उघडकीस झालं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे. मृत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर काम करत होता सोमवारी काम आटपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला. त्यावेळी अमर उर्फ लखन बारोट व पराग उर्फ बबलू आरखे या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असल्याचं सांगत गोलानी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर नेले. तेथे मद्यपान करत असताना अमर व पराग या दोघांनी मुकेशसोबत वाद घातला.

हनी ट्रॅपमध्ये अडकला, हेरगिरीच्या आरोपाखाली हवाई दलाचा जवान देवेंद्रला अटक

या वादातून दोन्ही मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली. घटनेनंतर अमर उर्फ लखन व पराग उर्फ बबलू हे दोघे पोलीस स्टेशनला जाऊन मुकेश वरून पडल्याची बतावणी करत पोलिसांना माहिती दिली.याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता मुकेशला वरून ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट आणि पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या दोघांना अटक केली असून त्यांचा सहकारी निखिल राजेश सोनवणे यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिसcctvसीसीटीव्हीArrestअटकDeathमृत्यू