Friend's nude photo keep as WhatsApp status | मैत्रिणीचा फोटो विवस्त्र करून ठेवला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला  

मैत्रिणीचा फोटो विवस्त्र करून ठेवला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला  

ठळक मुद्देएक्स गर्लफ्रेंडचे फोटो विवस्त्र करून व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून तरुणाला अटक केली.

मुंबई - प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतापलेल्या तरुणाने एक्स गर्लफ्रेंडचे फोटो विवस्त्र करून व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी २० वर्षीय तरुणाला जेरबंद केले आहे.

कुरार येथे राहणाऱ्या तरुणाचे एका मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून मैत्रीण त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागली होती. याबाबत तरुणाने मैत्रिणीला विचारले असता तिने पुढे प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने काही दिवसांपूर्वी एकत्र आक्सा बीचवर फिरायला गेल्यावर काढलेला मैत्रिणीचा आक्षेपार्ह फोटो त्याने व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटसवर ठेवला. याबाबत मैत्रिणीने तरुणाला जाब विचारताच संबंध तोडल्यास हा फोटो शोधलं मीडियावर वायरल करण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करून तरुणाला अटक केली.

Web Title: Friend's nude photo keep as WhatsApp status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.