बहिणीचा फोटो Whats App स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून मित्राने मित्राला चाकूने भोसकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 19:14 IST2021-12-31T19:14:01+5:302021-12-31T19:14:33+5:30
Murder Case : याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली.

बहिणीचा फोटो Whats App स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून मित्राने मित्राला चाकूने भोसकले
सदानंद नाईक
उल्हासनगर : मित्राने बहिणीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवल्याच्या रागातून दोघांनी प्रभात गार्डन येथे चाकूने भोसकल्याचा प्रकार काही दिवसापूर्वी उघड झाला. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात राहणाऱ्या रोहित कांजन याने मित्रा विजय रूपानी याच्या बहिणीचा फोटो Whats App स्टेटसवर ठेवला होता. या रागातून विजय रूपानी याने मित्र पंकज कुकरेजा यांच्या मदतीने पाच दिवसांपूर्वी प्रभाग गार्डन गाठून, एका इमारती खाली मित्रा सोबत बोलणाऱ्या रोहित कांजन याला गाठले. यावेळी Whats App स्टेटसवर बहिणीचा फोटो का ठेवला?. याचा जाब विचारून रागाच्या भरात पोटात चाकूने भोकसले. हिललाईन पोलीस ठाण्यात सुरवातीला भांदवी ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मात्र डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानुसार भादंवि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी विजय रूपानी व पंकज कुकरेजा यांना अटक केली. अधिक तपास हिललाईन पोलीस करीत आहेत.