मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; आपसात झालेल्या भांडणातून घडली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 18:24 IST2021-06-10T18:23:16+5:302021-06-10T18:24:00+5:30
Crime News : बंगाली शाळेजवळील घटना : आरोपी झाला पसार

मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून केली हत्या; आपसात झालेल्या भांडणातून घडली घटना
गोंदिया : आपसात झालेल्या भांडणातून मित्रानेच मित्राला दगडाने ठेचून ठार मारल्याची घटना रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत बंगाली शाळेजवळ घडली. बुधवारी (दि.९) मध्यरात्री दरम्यान घडलेल्या या घटनेतील मृताचे नाव बबलू कदिर कुरेशी (३५,रा. गोंदिया) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत बबलू कुरेशी व संशयीत आरोपी मुकेश रावते (३०,रा.पुणाटोली) हे मित्र आहेत. घटनेच्या दिवशी आरोपीने रावते याने कुरेशी याच्याकडे असलेला मोबाईल मागीतला होता व त्यावरूनच त्यांच्यात भांडण झाले होते. मात्र भांडण झाल्यानंतरही ते सोबतच होते व त्यानंतर मध्यरात्री पुन्हा त्यांच्यात भांडण झाले असावे व त्यातूनच रावतेने मोठा दगड कुरेशीच्या डोक्यावर मारून त्याला जागीच ठार केले. सकाळी लोक उठल्यावर त्यांना कुरेशीचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनस्थळ गाठून कारवाई करीत गुन्हा नोंद केला आहे. घटनेनंतर आरोपी रावते पसार असून तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे करीत आहेत.