शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा फॉर्म भरुन पास काढून देण्याच्या नावाखाली फसवणुक; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 14:15 IST

अडचणीत आलेल्यांना धरले वेठीस

ठळक मुद्देआतापर्यंत किमान ५ जणांची अशाप्रकारे फसवणुक झाल्याचे उघडकीस, संख्या मोठी असण्याची शक्यता

पुणे : उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रेल्वेचा पास काढून देतो, असे सांगून काही लोकांकडून प्रत्येकी १ हजार रुपये घेऊन फसवणुक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुष्पा विठ्ठल मंदारे (रा. कामधेनू इस्टेट, हडपसर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी राजेशकुमार शामाचरण गौतम (वय ४०, रा. चिंतामणीनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशकुमार गौतम मुळचे उत्तर प्रदेशातील भादोही जिल्ह्यातील राहणारे आहेत. हडपसर भागात ते पान टपरी चालवितात. पण लॉकडाऊनमुळे त्यांची पान टपरी गेली २ महिने बंद आहे. रेल्वेतून परप्रांतियांना त्यांच्या गावी घेऊन जाण्याची सुविधा निर्माण केल्याचे त्यांना माहिती झाले. त्याचवेळी पुष्पा मंदारे यांनी त्यांना व इतरांना तुमचे रेल्वेने जाण्याचे फॉर्म भरुन देते व तुमचा पास काढून देते, असे सांगितले. त्यासाठी त्यांना हडपसर येथील गाडीतळ पुलाखाली २२ मे रोजी बोलावले होते. या कामासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी १ हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर गौतम व इतरांनी त्यांच्याकडे वारंवार विचारणा केली तर तेव्हा त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यांनी चौकशी केल्यावर उत्तर प्रदेशसाठी अनेक रेल्वेगाड्या पुण्यातून गेल्या तरी त्यांचा पास काढून दिला नाही. आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आतापर्यंत किमान ५ जणांची अशाप्रकारे फसवणुक झाल्याचे उघडकीस आले आहे.  फसवणुक झालेल्यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.लॉकडाऊनमुळे रोजगार बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात गरीब लोकांसाठी १ हजार रुपयेही मोठी रक्कम होते. अडचणीत असलेल्यांना वेठीस धरुन फसवणुकीच्या या प्रकारात रक्कम कमी असली तरी पोलिसांनी त्यातील गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी