Four member's of one Family is missing in Nalasopara? | नालासोपाऱ्यातून चार जणांचे कुटुंब गायब?

नालासोपाऱ्यातून चार जणांचे कुटुंब गायब?

नालासोपारा  - पूर्वेकडील धानिवबाग तलावाशेजारील चाळीत राहणाऱ्या शुक्ला कुटुंबातील ४ जण तीन दिवस झाले तरी गायबच आहे. त्यांचा अजून कोणताही थांगपत्ता लागलेलाच नाही. पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले असून त्यांचा कोणताही पुरावा सापडत नाही. वालीव पोलिसांनी गुरु वारी मनुष्य मिसिंगची नोंद केली आहे.

नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग तलावाशेजारील ओम  साई चाळीतील रूम नंबर २२ मध्ये बाळकृष्ण जयप्रकाश शुक्ला (३३) हे पत्नी व तीन मुलांसोबत राहत होते. ते रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करायचे. त्यांची पत्नी श्वेता (२८) ही करण (१२), आर्यन (१०) आणि अनुज (७) यांच्यासह तीन दिवस झाले गायब आहे.

हे गायब प्रकरण मुलांचे वडील बाळकृष्ण यांच्यामुळे उघडकीस आले आहे. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या आणि गावच्या नातेवाईकांकडे व मित्र मंडळीकडे शोध घेतला तरी सापडत नसल्यामुळे आणि काहीही संपर्कहोत नसल्यामुळे वालीव पोलीस ठाण्यामध्ये गुरुवारी फोटोसह गायब असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

शुक्ला परिवारातील ४ सदस्य गायब प्रकरणी नातेवाईकांनी तक्रार दिली आहे. आमचे शोधकार्य सुरू असून तपास सुरू आहे. घरगुती काही भांडणामुळे ते गावीच गेले असल्याचा संशय आहे.
- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वालीव पोलीस ठाणे.

Web Title: Four member's of one Family is missing in Nalasopara?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.