उल्हासनगरात क्रिकेट सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 20:10 IST2022-04-01T20:09:20+5:302022-04-01T20:10:06+5:30

Cricket Betting : याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून रोख रक्कमेसह १ लाख ४६ हजाराचे साहित्य जप्त केले.

Four arrested for betting on cricket in Ulhasnagar | उल्हासनगरात क्रिकेट सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

उल्हासनगरात क्रिकेट सट्टा लावणाऱ्या चौघांना अटक

सदानंद नाईक

उल्हासनगर : आयपीएलच्या बंगलोर-कलकत्ता क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या स्मार्ट फोन शॉप दुकानावर बुधवारी रात्री ठाणे गुन्हे शाखेने धाड टाकून चौघांना अटक केली. याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्याकडून रोख रक्कमेसह १ लाख ४६ हजाराचे साहित्य जप्त केले.

उल्हासनगर कॅम्प नं-४ पूनम हॉटेल जवळील एका मोबाईल दुकानात आयपीएल क्रिकेट समान्यावर सट्टा लावला जात असल्याची महिती ठाणे मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष शाखेला मिळाली. त्यांनी बुधवारी रात्री साडे अकरा वाजता स्मार्ट शॉप दुकानावर धाड टाकली. यावेळी चौघेजण कलकत्ता व बंगलोर क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारे चिरंजीवी आहुजा, कुणाल समनांनी, नवीन उर्फ वाशु तलरेजा व राजेश वच्छानी यांना अटक केले.त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप व रोख रक्कम असे एकून १ लाख ४६ हजाराचा ऐवज जप्त केला. अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत. आरोपी पैकी चिरंजीवी आहुजा यांच्यावर यापूर्वीही क्रिकेट सट्टा प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Web Title: Four arrested for betting on cricket in Ulhasnagar