खंडणीसाठी तरुणाची हत्या, चार आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 07:43 PM2019-12-17T19:43:37+5:302019-12-17T19:44:09+5:30

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने दोन ते तीन तालुक्यात फिरवून त्यानंतर रात्री खून करून मृतदेह वाघदीच्या पाण्यात टाकण्यात आला. 

Four accused arrested for Murder of youth for ransom | खंडणीसाठी तरुणाची हत्या, चार आरोपींना अटक

खंडणीसाठी तरुणाची हत्या, चार आरोपींना अटक

Next

गोंदिया : खंडणीसाठी २० वर्षाच्या तरुणाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरभ मोरेश्वर कटारे (२०) रा. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे. खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्यानंतर सदर तरुणाने आरोपीला ओळखल्याने त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. त्यानंतर दुपारी २.३० वाजतापासून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा १२ तास तडफडून त्याचा मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला चारचाकी वाहनाने गोंदिया जिल्ह्यातील दोन ते तीन तालुक्यात फिरवून त्यानंतर रात्री खून करून मृतदेह वाघदीच्या पाण्यात टाकण्यात आला. 

खंडणीसाठी मृत तरुणाचा नातेवाईक (आतेभाऊ) अंकित राधेशाम बिरनवार (२१) रा.कमरगाव गोरेगाव याने १५ डिसेंबरच्या दुपारी फोन करून सौरभला गोंदियाच्या मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालयासमोर बोलावले. त्यावेळी दुपारी २.३० वाजता दरम्यान सौरभ त्या ठिकाणी आला असता. आरोपींनी खंडणी मागण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यावर बिअरच्या बॉटलच्या काचाने डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली. इतकेच नव्हे तर त्याला चारचाकी वाहनात टाकून त्याला गोंदियातून गोरेगाव तालुक्याच्या मांडोबाईपर्यंत नेले. खंडणी मागण्याचा उद्देश होता. अंकीत बिरनवार हा त्याच्या नात्यात असल्याने अपहरण करतांना सौरभने आपल्याला ओळखले त्यामुळे त्याचा खून करणे आवश्यक असल्याचे ठरवून अंकीतने इतर आरोपींच्या मदतीने त्याचा खून करण्याचा चंग बांधला. १५ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता त्याच्या डोक्यावर काचेच्या बॉटलने मारून तो रक्ताच्या थारोळ्यात तडफडत राहीला. रात्री १२ वाजतापर्यंत त्यांनी त्याला तडफडत ठेवले. तरीही तो जिवंत असल्याचे पाहून कामठा जवळील एका गावातील पुलाखाली नेऊन त्याचा गळा दाबून खून करण्यात आला.

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याचा मृतदेह वाघनदीच्या पात्रात टाकण्यात आले. वाघनदीच्या पात्रात मृतदेह टाकतांना त्याच्या मृतदेहाला दगड बांधण्यात आले होते. यासंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, ३६३, ३६६, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अंकीत राधेश्याम बिरनवार (२१) रा. कमरगाव (गोरेगाव), राजू मारबते (२१) गजेंद्र मारबते (१९) व चित्तेश्वर बिसेन (२१) रा. बटाणा अश्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप घोंगे करीत आहेत. 
 
आरोपी वाढण्याची शक्यता
या खंडणी प्रकरणात सहकार्य करणाऱ्या आरोपींची संख्या अधिक आहे. पोलिसांनी सद्या चारच जणांना अटक केली आहे. परंतु त्याला सोडून देणारा, आरोपींना मदत करणारे लोक अद्याप अटक झाले नाहीत.यासंदर्भात सद्या पोलिसांनी तपासाच्या नावार अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु याप्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Four accused arrested for Murder of youth for ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.