सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, भिवंडीत अज्ञाताने जाळल्या तीन दुचाकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:11 PM2020-07-30T20:11:09+5:302020-07-30T20:12:12+5:30

दुचाकीला अज्ञात समाजकंटकाने आग लावून पळ काढल्याचा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे या वाढत्या दुचाकी जळीतकांडामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

Fortunately, a major accident was averted and three two-wheelers were burnt in Bhiwandi | सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, भिवंडीत अज्ञाताने जाळल्या तीन दुचाकी 

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, भिवंडीत अज्ञाताने जाळल्या तीन दुचाकी 

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी - पहाटेच्या सुमारास इमारतीखाली पार्किंगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या तीन दुचाकी जाळण्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. ही घटना भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी गावातघडली असून इमारती मधील नागरीकांना वेळीच जाग आल्याने आग विझविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तर याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           कशेळी ग्रामपंचायत क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या शेजारील अष्टविनायक एन्क्लेव्ह ही इमारत असून इमारती समोरील मोकळ्या जागेत तेथील रहिवाश्यांनी दुचाकी उभ्या करून ठेवल्या होत्या. त्यादरम्यानगुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुचाकींना आग लावली. या आगीत तीन दुचाकी जळून खाक झाल्या असून सुदैवाने आगीच्या ज्वालांनी इमारती मधील नागरीकांना जाग आल्याने त्यांनी लागलीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळून मोठी वित्तहानी टळली आहे .या प्रकरणी नारपोली पोलिसांकडे दाखल गुन्ह्यात आरोपीचा शोध घेत आहेत .दरम्यान, दोन दिवसापूर्वीच भिवंडी लगत असलेल्या मीठ पाडा परिसरातही एका दुचाकीला अज्ञात समाजकंटकाने आग लावून पळ काढल्याचा गुन्हा भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यामुळे या वाढत्या दुचाकी जळीतकांडामुळे वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप

 

लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त

 

स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

 

भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू

 

Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न 

 

खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या  

 

तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्... 

 

Web Title: Fortunately, a major accident was averted and three two-wheelers were burnt in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.