Former police inspector, encounter specialist Pradip Sharma admitted to NIA office, inquiry to begin | माजी पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या कार्यालयात दाखल, सुरु होणार चौकशी

माजी पोलीस निरीक्षक, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएच्या कार्यालयात दाखल, सुरु होणार चौकशी

ठळक मुद्देया प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही आज सकाळी ९. ३० वाजल्यापासून चौकशी सुरू केली आहे. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपद गमवावे लागले आहे. दरम्यान, अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएने (NIA) या प्रकरणात परमबीर सिंग यांच्याकडेही आज सकाळी ९. ३० वाजल्यापासून चौकशी सुरू केली आहे. आता NIA कार्यालयात माजी पोलीस निरीक्षक आणि  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा दाखल झाले असून त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. (Former Mumbai Police inspector Pradip Sharma  arrives at the NIA office)

परमबीर सिंग हे आज सकाळी ९. ३० वाजताच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले. तिथे त्यांनी जबाब नोंदवला असून ते NIA कार्यालयातून निघाले आहे. सिंग यांची अँटलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसेच वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिलेल्या विशेष अधिकारांबद्दल एनआयएकडून त्यांची चौकशी झाली आहे. तसेच आता माजी  एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची देखील NIA कडून चौकशी केली जाईल. त्यामुळे नेमका  अँटिलियाजवळ उभी करण्यात आलेली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ (Antilia bomb scare case) आणि मनसुख हिरेन हत्या शर्मा यांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय संबंध याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र, प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्यात भेट झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

 प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश करून नालासोपारा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढले  

'एन्काउंटर स्पेशालिस्ट' अशी ओळख असलेले मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा राजकारणाच्या आखाड्यात उतरले. त्यांनी आधी म्हणजेच २०१४ मध्ये रिपब्लिकन पक्षात सक्रिय झाले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढले आहेत. 

प्रदीप शर्मा यांची कारकीर्द 

१९८३ साली पोलीस सेवेत रूजू झालेले प्रदीप शर्मा हे घाटकोपर आणि माहीम ही दोन पोलीस ठाणी वगळता बहुतांश काळ मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काऊंटर करण्याची कामगिरी शर्मा यांच्याच नावावर आहे. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील 'लष्कर-ए-तोयबा'च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा समावेश आहे. त्यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता.

Web Title: Former police inspector, encounter specialist Pradip Sharma admitted to NIA office, inquiry to begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.