पैसे न दिल्यास घरात घुसून ठार मारण्याची झारखंडच्या माजी उपमुख्यमंत्री सुदेश कुमार महतो यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 19:23 IST2021-01-06T19:20:12+5:302021-01-06T19:23:18+5:30
Former Jharkhand Deputy Chief Minister threatened for ransom : उत्तरप्रदेशातील सराईत गुन्हेगारास अटक, गुन्हे शाखेची कारवाई

पैसे न दिल्यास घरात घुसून ठार मारण्याची झारखंडच्या माजी उपमुख्यमंत्री सुदेश कुमार महतो यांना धमकी
मुंबई : झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार सुदेश कुमार महतो यांना १५ लाखांच्या खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला बुधवारी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ६ ने ही कारवाई केली आहे. महातो यांचे खासगी सचिव महेंद्र कुमार शर्मा यांच्या फिर्यादीवरून झारखंड येथील गोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १४ ऑगस्ट रोजी महतो यांना फ़ोनवरून आरोपीने १५ लाख रूपयांची खंडणी मागीतली. पैसे न दिल्यास घरात घुसून गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिली.
अशात तांत्रिक तपासात आरोपी शिवाजी नगर येथे असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष ६ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक चंद्रकांत दळवी, सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल चौगुले, पोलीस अंमलदार उज्वल सावंत, संभाजी कोळेकर, सुरेश घेरडे यांनी तपास सुरु केला. दोन दिवसांच्या मेहनतीनंतर आरोपी त्यांच्या जाळयात अडकला. त्याने गुह्याची कबुली दिली. तो मुळचा प्रतापगडचा रहिवासी असून, झारखंड मध्ये त्याच्या विरुद्ध दोन गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. पुढील तपासासाठी त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.