तलाठ्याचं घर फोडून जबरी चोरी, श्वान पथकाने केली परिसराची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 13:29 IST2021-12-02T13:28:52+5:302021-12-02T13:29:26+5:30
तलाठी योगेश जगताप (वय ३४, रा.कथले विहार, कॅन्सर हॉस्पिटलच्या मागे, बार्शी) व घरातील इतर लोक रात्री जेवण करून झोपले होते. रात्री ३च्या सुमारास दरवाजा तोडीत असताना आवाज आले.

तलाठ्याचं घर फोडून जबरी चोरी, श्वान पथकाने केली परिसराची पाहणी
सोलापूर : जिल्ह्याच्या बार्शी शहरातील आगळगाव रोडवर राहणारे भूम तालुक्यातील तलाठी योगेश शंकरराव जगताप यांचे बंद चौघांनी फोडले. चाकूचा धाक दाखवून दमदाटी करून अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना १ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत चौघांविरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
तलाठी योगेश जगताप (वय ३४, रा.कथले विहार, कॅन्सर हॉस्पिटलच्या मागे, बार्शी) व घरातील इतर लोक रात्री जेवण करून झोपले होते. रात्री ३च्या सुमारास दरवाजा तोडीत असताना आवाज आले. तेव्हा बेडरूममधून बाहेर येत असताना त्यांना चार जण अंगावर काळ्या रंगाचे कपडे घालून आल्याचे समोरच दिसले. त्यांच्याकडे चाकू व कटवणी दिसली. एकाने सोने पैसे काढा, अशी धमकी दिली. एकाने कपाट उघडून त्यातील चैन, ग्रसलेट, नेकलेस, दोन अंगठ्या आदी दागिने घेऊन अजून द्या, नाहीतर मुलीला घेऊन जातो, अशी धमकी देताच, पत्नीच्या अंगावरील दीड तोळ्याचे गंठण, कानातील झुबे, आईच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र, झुबे असे एकूण सहा तोळ्याचे दागिने काढून दिले, तर योगेश जगताप यांच्या पॅन्टच्या खिशातील २५ हजार काढून नेले.
दरम्यान, या घटनेनंतर सोलापूरचे श्वानपथक पाचारण करण्यात आले. श्वान घराजवळच घुटमळले, तसेच ठसे तज्ज्ञांकडून पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, करमाळा पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे, पोलीस निरीक्षक रामदास शेळके आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याचा पुढील तपास सपोनि.ज्ञानेश्वर उदार करीत आहेत.