लग्नाच्या बेडीत अडकता अडकता अडकला पोलिसांच्या बेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 20:16 IST2019-02-13T20:11:14+5:302019-02-13T20:16:26+5:30
मोबाईल लंपास करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्याला तुरुंगात जावं लागलं आहे.

लग्नाच्या बेडीत अडकता अडकता अडकला पोलिसांच्या बेडीत
वसई - लग्नाच्या आदल्या दिवशीच एका चोरट्याला चोरी कारण खूपच महागात पडले आहे. त्यामुळे लग्नाच्या बेडीत अडकण्याऐवजी तो पोलिसांच्या बेडीत अडकला आहे. लग्न पत्रिक वाटण्यासाठी हा चोर वसईत आला होता. मात्र, मोबाईल लंपास करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्याला तुरुंगात जावं लागलं आहे.
भिवंडीत राहणारा फिरोज अन्सारी हा चोर आहे. मोबाईल चोरीत सराईत असून रविवारी त्याचे लग्न होते. यासाठी वसईमध्ये आपल्या बहिणीकडे लग्नपत्रिका देण्यासाठी आला होता. तेथून मित्र, नातेवाईकांना भेटण्यासाठी वालीव परिसरात आला. शनिवारी जाता जाता पुन्हा एक मोबाईल चोरण्याचा विचार त्याच्या मनात आला आणि त्याला पोलिसांनीअटक केली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या एक इसम मोबाईलवर बोलण्यात गुंग होता. त्याला धक्का मारून त्याच्या हातातील मोबाईल घेऊन पळ काढला.त्यानंतर या इसमाने मदतीसाठी आरडाओरड केला. लोकांनी पाठलाग करून फिरोजला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.