शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

फ्लॅट, जमीन, कार आणि रोकड; फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांची संपती पाहून बसेल धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 12:46 IST

Vaishali Zankar Veer Bribe Case Update: एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबीकडून झाडाझडती घेतली जात आहे.

मुंबई - एसीबीच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या मालमत्तेची एसीबीकडून झाडाझडती घेतली जात आहे. (Vaishali Zankar Veer Bribe Case)दरम्यान, या चौकशीमधून वैशाली धनकर यांच्याकडील संपत्तीबाबत महत्त्वपूर्ण माहिती एसीबीच्या हाती लागली आहे. या माहितीनुसार वैशाली धनकर यांच्याकडे फ्लॅट, जमीन, कार, रोख रक्कम अशी मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. (Flats, land, cars and cash; Fugitive education officer Vaishali Zankar's wealth will be a shock)

वैशाली धनकर यांच्या नावावर मुरबाड, कल्याण रोड, नाशिक शिवाजीनगर, कल्याण गंधारे आणि नाशिक गंगापूर रोड येथे मिळून चार प्लॅट असल्याचे समोर आले आहे. तसेच वैशाली झनकर यांच्या नावावर सिन्नरमध्ये ०.५७ गुंठे, ०.५६ गुंठे, १.५१ गुंठे, ३.४१ गुंठे जमीन आहे. तसेच कल्याणमधील मिलिंदनगर येथे ३१.७० गुंठे, १०.०८ गुंठे, ४०.८० गुंठे आणि १३.१० गुंठे जमीन आहे. त्याबरोबरच सिन्नरमध्ये अजून ०.२२.७० गुंठे एवढी मालमत्ता आहे. त्याशिवाय वैशाली धनकर यांच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम, होंडा सिटी कार आणि एक दुचाकी त्यांच्या नावावर असल्याचे त्यांच्या घराच्या झाडाझडतीमधून समोर आले. तसेच त्यांच्याकडे विविध बँकांची पासबुकेही आढळून आली आहेत.

त्याशिवाय या प्रकरणातील अन्य आरोपी असलेल्या वाहन चालक ज्ञानेश्वर येवले याच्या घरी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये त्याच्याबरोबरच त्याच्या पत्नी आणि मुलांच्या नावावर वेगवेगळ्या बँकांच्या पासबूकसह दोन गाड्यांचे आरसीबूक सापडले आहे. तसेच दशपुते या शिक्षकाच्या नावावर नाशिकमध्ये टू बीएचके फ्लॅट दुचाकी आणि तीन बँक खाती असल्याचे उघड झाले आहे 

दरम्यान, शासनाने मंजूर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरू करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी लाचेची रक्कम मागितली होती. यानंतर तक्रारदार संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. यानुसार त्यांच्या आदेशान्वये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहनिशा करत पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य जाणवले. यानुसार ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील सापळा अधिकारी पल्लवी ढगे यांच्या पथकाने नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचला होता. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास तडजोड व्यवहारात ठरल्याप्रमाणे आठ लाखांची रक्कम स्वीकारण्यासाठी झनकर यांचा शासकीय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला असता, त्याने तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताच पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता झनकर यांच्या आदेशान्वये त्याने रक्कम घेतल्याचे समजल्यानंतर पथकाने जिल्हा परिषदेच्या वास्तूमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतले. ढगे यांनी झनकर यांची या गुन्ह्याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषदेत चौकशी व पडताळणी केली असता, त्यांनी तडजोडीअंती ८ लाखांची रक्कम स्वीकारल्याचे मान्य करत पुढील व्यवहार चालक येवलेसोबत करण्यास सांगितले होते, अशी माहिती पथकाच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणNashikनाशिक