शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

साडेपाच हजार पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक : हॅकर्सनी घातला कोट्यवधींना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 06:00 IST

सुरक्षित असलेले पण सायबर साक्षर नसलेले असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांना आपल्या खात्याची माहिती देतात व त्यानंतर हॅकर्स त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात़.

ठळक मुद्देपोलिसांनी ३०० जणांना परत मिळवून दिले ४ कोटी या प्रकरणात ४९ आरोपींना सायबर सेलने केली़ अटक पुणे सायबर शाखेकडे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे वर्षभरात ५ हजार ५०७ अर्ज आले.

विवेक भुसेपुणे : बँकेतून बोलत असल्याचे सांगून, तुम्हाला लॉटरी लागली आहे, विम्याचे पैसे मिळवून देतो, अशी असंख्य कारणे सांगून हॅकर्सनी वर्षभरात तब्बल साडेपाच हजार पुणेकरांच्या बँक खात्यातून कोट्यावधींची रक्कम लंपास केली आहे़. पुणे सायबर गुन्हे शाखेने वर्षभरा ४९ आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे़. बँकेतून कोणीही फोन करुन तुमचा पासवर्ड मागत नाही़. कोणालाही बँक खात्याची माहिती देऊ नका, असे बँका तसेच पोलिसांकडून जनजागृती केली जात असते़. तरीही सुरक्षित असलेले पण सायबर साक्षर नसलेले असंख्य लोक हॅकर्सने दाखविलेल्या आमिषाला बळी पडून त्यांना आपल्या खात्याची माहिती देतात व त्यानंतर हॅकर्स त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतात़.  भारतीय कंपन्यांशी संबंधित असलेले परदेशी व्यापारी कंपन्यांचे ईमेल हॅक करुन परस्पर दोन कंपन्यांमध्ये होत असलेले आर्थिक व्यवहाराबाबत माहिती घेऊन परदेशी व्यापारी कंपन्यांचे फेक ईमेल आयडी बनवून भारतीय कंपन्यांशी ई मेलद्वारे संपर्क साधून दुसऱ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले जाते़. नोकरीसाठी नामवंत कंपन्यांच्या साईटसारखी फेक साईट बनवून त्याद्वारे नोकरीचे आमिष दाखवून तरुण तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात असल्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल होत आहे़. पुणे सायबर शाखेकडे आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे वर्षभरात ५ हजार ५०७ अर्ज आले होते़. त्यापैकी ४ हजार २२२ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले होते़. त्यापैकी ६८० प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले़ तर ६०५ अर्ज दप्तरी दाखल केले गेले़ या प्रकरणात ४९ आरोपींना सायबर सेलने अटक केली़. या वर्षभरात सर्वात मोठा सायबर हल्ला कॉसमॉस बँकेच्या सर्व्हर करण्यात आला होता़. प्रोक्सी सर्व्हर तयार करुन हकर्सनी एकाच वेळी २९ देशातून अडीच हजार क्लोन व्हिसा आणि रुपे कार्डचा वापर करुन तब्बल ९४ कोटी रुपये लंपास करण्यात आले होते़. याप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी प्रत्यक्ष पैसे काढणाऱ्या ११ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ६ लाख रुपये जप्त केले आहेत़. या प्रकरणात पोलिसांनी इंटरपोलचीही मदत घेतली आहे़ 

३०० जणांना मिळाले ४ कोटी १२ लाख परतज्या ऑनलाईन तक्रारीत ओटीपी शेअर केला गेला असेल,तर त्या प्रकरणात बँकेकडून फसवणूक झालेली रक्कम रिफंड केली जात नाही़ अशा प्रकरणात पैसे विविध मर्चंट/ वॉलेटमध्ये पैसे गेले असतात़. सायबर सेलकडून संबंधितांना तातडीन मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना रक्कम परत मिळवून दिली जाते़. त्यात प्रामुख्याने नोकरीच्या बहाण्याने, क्रेडीट कार्ड असतानाही फसवणूक झाली़. तसेच कोणतीही बँकेची माहिती शेअर केली नसतानाही त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात आले, अशा सुमारे ३०० अर्जदारांबाबत सायबर सेलने संबंधित मर्चंट / वॉलेट यांच्याशी संपर्क साधून अर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिले़. २०१८ मध्ये सायबर सेलने अशा प्रकारे ४ कोटी १२ लाख ५५ हजार ९०५ रुपये रिफंड मिळवून दिला आहे़.  सायबर सेलची कामगिरी (२०१८)र्५५०७    आलेले अज६८०        गुन्हे दाखल४९        अटक आरोपी३००        रिफंड मिळवून दिलेले अर्जदार ४ कोटी १२ लाख ५५ हजार ९०५    रिफंड रक्कम    ६०५        दप्तरी दाखल अर्ज ४२२२        कारवाईसाठी पोलीस ठाण्याकडे पाठविलेले अर्ज

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीonlineऑनलाइनPoliceपोलिस