शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

५ वर्षीय मुलीचे अपहरण करून विक्री; ६० वर्षीय बीएएमएस महिला डॉक्टरसह पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 07:51 IST

नवी मुंबईतून मुलीची केली सुटका, पीडित मुलीची आईला मानसिक विकार असल्यामुळे ती रोज रात्री घराबाहेर पार्क रिक्षात झोपायची. 

मुंबई - मानसिक आजारी असलेल्या एका आईच्या असहायतेचा फायदा घेऊन तिचा भाऊ, पत्नी, मुलगा आणि एका रिक्षाचालकाने तिच्या पाच वर्षीय मुलीचे अपहरण करून एका बीएमएस डॉक्टरला विकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला येथून वृंदा चव्हाण (६०) या बीएएमएस डॉक्टरसह सहा जणांना वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीला आरोपी मामानेच सहा लाख रुपयांना विकल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी मुलीची नवी मुंबई परिसरातून सुटका केली.

अटक झालेली डॉक्टर वृंदा ही अलीकडेच पती गमावल्याने मूल दत्तक घेण्याच्या विचारात होती. याच कारणामुळे तिने आपल्या सोसायटीत क्लिनरचे काम करणाऱ्या करण सणस (२५) याच्याशी संपर्क साधला. सणसने मित्रांच्या मदतीने मुलीचे अपहरण करून वृंदा यांना सहा लाख रुपयांना विकल्याची माहिती समोर आली. पीडित मुलगी आईसोबत वाकोल्यात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डोळे उघडले, तेव्हा मुलगी कुशीत नव्हतीपीडित मुलीची आईला मानसिक विकार असल्यामुळे ती रोज रात्री घराबाहेर पार्क रिक्षात झोपायची. २० नोव्हेंबरच्या मध्यरात्री मामा निकोलस फर्नांडिस, त्याची पत्नी मंगल, मुलगा नितीन आणि रिक्षाचालक लतीफ शेख, तसेच करण सणस यांनी मिळून रिक्षात आईच्या कुशीत झोपलेल्या मुलीचे अपहरण केले. सकाळी आईचे डोळे उघडले, तेव्हा मुलगी कुशीत नव्हती. मात्र, त्यावेळी घाबरून कुणालाही याबाबत सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी तिने पतीला माहिती दिल्यानंतर वाकोला पोलिसात तक्रार नोंदवली. 

‘व्ही’ लिहिलेल्या रिक्षाचा पथकांकडून शोधपोलिस उपायुक्त मनीष कलवनिया यांच्या मार्गदर्शनाखाली वाकोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक सहदेव डोळे, निरीक्षक वैभव सामी, सहायक पोलिस निरीक्षक महेश तळेकर, सुनील सर्वे, उपनिरीक्षक रितेश माळी, संग्राम बागल, विजय ठोसर, जीवन गुट्टे, अरुण बांगर, यशपाल बडगुजर, सुनीता घाडगे यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकांनी २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानुसार मागे ‘व्ही’ चिन्ह असलेली रिक्षा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर  ही रिक्षा आरोपी शेखची असल्याचे समजले. त्याला इतर आरोपींनी अपहरणात मदत करण्यासाठी ६ हजार रुपये दिले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Five-Year-Old Kidnapped and Sold; Doctor, Five Arrested

Web Summary : Mumbai: A five-year-old girl was kidnapped and sold for six lakh rupees. Police arrested a doctor and five others, including the girl's maternal relatives and a rickshaw driver. The girl has been rescued from Navi Mumbai.
टॅग्स :Kidnappingअपहरण