धक्कादायक! एकाच घरात पाच जणांचे मृतदेह सापडले, घटनास्थळी फक्त दुधाचे ग्लास होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 12:13 IST2026-02-10T11:59:29+5:302026-02-10T12:13:29+5:30

उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्याने घबराट पसरली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी दुधाचे ग्लास आढळले आहेत. त्यांनी दुधात विष घालून आत्महत्या केल्याचा संशय आहे.

Five bodies found in the same house, only glasses of milk were found at the scene | धक्कादायक! एकाच घरात पाच जणांचे मृतदेह सापडले, घटनास्थळी फक्त दुधाचे ग्लास होते

धक्कादायक! एकाच घरात पाच जणांचे मृतदेह सापडले, घटनास्थळी फक्त दुधाचे ग्लास होते

उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महावनच्या खप्परपूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. मृतदेहांजवळ दुधाचे ग्लास आढळले आहेत. पाचही जणांनी दुधात विष मिसळून आत्महत्या केल्याचा संशय आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, एक मुलगा आणि दोन मुलींचा समावेश आहे. 

मोठा अनर्थ टळला! रस्त्यावर अचानक विमानाचे आपत्कालीन लँडिंग, अनेक वाहनांना धडक; व्हिडीओ आला समोर

रात्री उशिरा ही घटना घडली. सकाळी सर्वजण जागे न झाल्याने कुटुंबातील सदस्यांना आणि आजूबाजूच्या लोकांना घटनेची माहिती मिळाली. स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत. फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिस कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांकडून माहिती घेत आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल.

खप्परपूर येथील रहिवासी ३५ वर्षीय मनीष हा शेतकरी होता. सकाळी घरातून कोणीही बाहेर न आल्याने लोकांना संशय आला. त्यांना घरात मनीष, त्याची पत्नी, ३२ वर्षीय सीमा, पाच वर्षीय मुलगी हनी, चार वर्षीय प्रियांशी आणि दोन वर्षांचा मुलगा पंकज यांचे मृतदेह पडलेले आढळले. 

पाच मृतदेह पाहून लोकांमध्ये गोंधळ उडाला. पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांच्या माहितीनुसार, स्वयंपाकघरातील भिंतीवर एक चिठ्ठी लिहिलेली होती. यामध्ये "आम्ही आत्महत्या करत आहोत." आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिस मनीषच्या कुटुंबाची आणि शेजाऱ्यांची चौकशी करत आहेत. त्याचे इतर दोन भाऊ शेजारी राहतात. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले.

Web Title : दर्दनाक! उत्तर प्रदेश में एक घर में पांच लोग मृत पाए गए।

Web Summary : उत्तर प्रदेश के मथुरा जिले में एक परिवार के पांच सदस्य मृत पाए गए। पुलिस को जहर से आत्महत्या का संदेह है। मृतकों में एक दंपति, उनका बेटा और दो बेटियां शामिल हैं। एक सुसाइड नोट मिला है, और मकसद जानने के लिए जांच जारी है।

Web Title : Tragedy: Five family members found dead in Uttar Pradesh home.

Web Summary : A family of five was found dead in Uttar Pradesh's Mathura district. Police suspect suicide by poisoning. The deceased include a couple, their son, and two daughters. A suicide note was found, and investigations are underway to determine the motive.