मोठा अनर्थ टळला! रस्त्यावर अचानक विमानाचे आपत्कालीन लँडिंग, अनेक वाहनांना धडक; व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 11:16 IST2026-02-10T11:08:50+5:302026-02-10T11:16:58+5:30

अमेरिकेतील जॉर्जिया येथील एका वर्दळीच्या रस्त्यावर आपत्कालीन लँडिंग दरम्यान एक लहान विमान अनेक वाहनांवर आदळले. विमानतळावर पोहोचण्यासाठी विमानात इंधन शिल्लक नव्हते, यामुळे हा अपघात झाला.

A major disaster averted! A plane suddenly makes an emergency landing on the road, hitting several vehicles; Video surfaced | मोठा अनर्थ टळला! रस्त्यावर अचानक विमानाचे आपत्कालीन लँडिंग, अनेक वाहनांना धडक; व्हिडीओ आला समोर

मोठा अनर्थ टळला! रस्त्यावर अचानक विमानाचे आपत्कालीन लँडिंग, अनेक वाहनांना धडक; व्हिडीओ आला समोर

अमेरिकेत आज एक मोठी दुर्घटना घडली असती. पण, थोडक्यात मोठा अनर्थ टळला. सोमवारी अमेरिकेतील जॉर्जियामध्ये रस्त्याच्या मधोमध एक छोटे विमान उतरले आणि नंतर ते अनेक वाहनांना धडकले. विमानात विमानतळावर पोहोचण्यासाठी इंधन नव्हते यामुळे अचानक रस्त्यावर त्याचे लँडिग करावे लागले अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, यामध्ये विमान एका वर्दळीच्या रस्त्यावर उतरताना आणि नंतर अनेक वाहनांना धडकताना दिसत आहे. या अपघातात अनेक लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

लँडिंगनंतर विमानाचा उजवा पंखा एका वाहनाशी आदळला आणि विमानाची इंधन टाकी लूज झाली. एका एसयूव्ही आणि वाहनाच्या मागील भागात घुसली. विमान लँडिंगनंतर रस्ता बंद करण्यात आला होता. लोकांना पुढील वाहतूक विलंब होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

विमान गेनेसविले ली गिल्मर मेमोरियल विमानतळावरून कॅन्टनमधील चेरोकी काउंटी प्रादेशिक विमानतळाकडे जात असताना हा अपघात झाला. उड्डाणानंतर काही वेळातच, वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्याने गेनेसविलेकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.

Web Title : बड़ा हादसा टला! अमेरिका में विमान की सड़क पर इमरजेंसी लैंडिंग

Web Summary : अमेरिका के जॉर्जिया में ईंधन खत्म होने के बाद एक छोटा विमान सड़क पर उतरा और कई वाहनों से टकरा गया। कई लोगों को मामूली चोटें आईं। चेरोकी काउंटी जा रहे विमान में इंजन की खराबी के कारण इमरजेंसी लैंडिंग करनी पड़ी और सड़क बंद कर दी गई।

Web Title : Major Disaster Averted! Plane Makes Emergency Landing on Road in America

Web Summary : A small plane made an emergency landing on a Georgia road after running out of fuel, colliding with multiple vehicles. Several people sustained minor injuries. The plane, en route to Cherokee County, experienced engine trouble, prompting the emergency landing and subsequent road closure.