खंडणीप्रकरणी मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पाच जणांना अटक; ३ दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:35 AM2020-08-23T02:35:36+5:302020-08-23T02:36:05+5:30

याबाबत तहसीलदार वरणगावकर यांनी पोलिसांना माहिती दिली़ त्यानुसार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला.

Five arrested, including two MNS taluka presidents, in ransom case | खंडणीप्रकरणी मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पाच जणांना अटक; ३ दिवसांची पोलीस कोठडी

खंडणीप्रकरणी मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह पाच जणांना अटक; ३ दिवसांची पोलीस कोठडी

Next

नांदेड : वाळूच्या प्रकरणात अगोदर पन्नास हजार रुपयांची खंडणी उकळल्यानंतर तहसीलदारांकडून पुन्हा एक लाख रुपये स्वीकारणाऱ्या मनसेच्या दोन तालुकाध्यक्षांसह ५ जणांना पोलिसांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अटक केली़

माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्याविरोधात अनेकवेळा अर्ज देऊन त्याबाबत स्थानिक वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या़ यापुढे तक्रारी न करण्यासाठी माहूरचे मनसे तालुकाध्यक्ष गजानन प्रभाकर कुलकर्णी, किनवटचे तालुकाध्यक्ष नितीन गणेश पोहरे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दुर्गादास राठोड, अंकुश भालेराव, राजकुमार नारायण स्वामी आणि कामारकर या सहा जणांनी दीड लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती़ त्यातील पन्नास हजार रुपये त्यांनी वरणगावकर यांच्याकडून यापूर्वीच घेतले होते़ उर्वरित एक लाख रुपये २१ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात देण्याचे ठरले होते. 

याबाबत तहसीलदार वरणगावकर यांनी पोलिसांना माहिती दिली़ त्यानुसार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. या ठिकाणी आरोपींना वरणगावकर यांच्याकडून खंडणी स्वरुपात एक लाखांची रक्कम घेताना पकडण्यात आले़ यामध्ये कामारकर वगळता इतर पाच जणांना अटक करण्यात आली आहे़ न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़

Web Title: Five arrested, including two MNS taluka presidents, in ransom case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.