शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

कारवाईच्या रागात पोलिसाचे अपहरण करत गाडी सुसाट पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 09:52 IST

Crime News: सिग्नल मोडून जाणाऱ्या कार चालकाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसाने त्याला चौकीकडे येण्यास सांगताच, त्याने पोलिसाला गाडीत बसण्यास सांगितले.

मुंबई : सिग्नल मोडून जाणाऱ्या कार चालकाला हटकल्याच्या रागात त्याने वाहतूक पोलिसासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. पोलिसाने त्याला चौकीकडे येण्यास सांगताच, त्याने पोलिसाला गाडीत बसण्यास सांगितले. पुढे, गाडी भांडूप पोलीस ठाण्याच्या दिशेने न नेता तो नवी मुंबईच्या दिशेने सुसाट निघाला. पोलिसाने वाहतूक नियंत्रण कक्षात कॉल करून मदत मागितली. भांडूपहून ऐरोलीमार्गे रंगलेल्या थराराला दिघा येथे ब्रेक लागला. सरकारी कामात अडथळा व अपहरणाच्या गुन्ह्यात भांडूप पोलिसांनी त्याला अटक केली. मुलुंड वाहतूक विभागात कार्यरत असलेले शैलेंद्र चव्हाण (३५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांंनी आरोपी चालक प्रणील गाडेकरवर गुन्हा दाखल झाला आहे. गाडेकर हा नवी मुंबईच्या सानपाडा येथील सेक्टर ७ मध्ये राहतो. तो चालक म्हणून काम करतो. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री टँक रोडकडून भांडूपकडे जाणारी वाहतूक थांबल्यामुळे ते वाॅर्डन सुरेश गायकवाडसोबत तेथे आले. तेव्हा एक कार चालक सिग्नल मोडून जाताना दिसला. चव्हाण यांनी त्याला अडविताच त्याने हुज्जत घातली. त्यांनी त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगताच चालक गाडेकरने त्यांना मागच्या सीटवर बसण्यास सांगितले.  पुढे भांडूप पोलीस स्टेशनच्या दिशेने कार न नेता, ऐरोलीमार्गे नवी मुंबईच्या दिशेने निघाला. त्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. तर दुसरीकडे गाडेकर हा ‘आता मी तुला दाखवतो’ म्हणत सुसाट वेगाने जात होता. ऐरोलीमार्गाने दिवा येथे पोहोचताच येथील विठ्ठल मंदिराजवळ  रबाळा पोलिसांनी त्याला अडविले. तेथून त्याला रबाळा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. थोड्या वेळाने मुलुंड पोलिसांनी तेथे धाव घेत चालकाला भांडूप पोलीस ठाण्यात आणत त्याच्यावर कारवाई केली आहे. याला भांडूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. तो दारूच्या नशेत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी