धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:08 IST2025-06-17T13:06:29+5:302025-06-17T13:08:05+5:30

ओडिसामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर दहा जणांनी सामुहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

First, they threatened to take a photo and make it viral men gang sexual assult young woman in front of her boyfriend | धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला

धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला

ओडिसामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर दहा जणांनी सामुहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना ओडिसा येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गोपालपूर समुद्र किनाऱ्यावर एक निर्जन स्थळावर घडली. 

मिळालेली माहितीनुसार, एका २० वर्षीय तरुणीवर सुमारे १० तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमवारी येथील एका खाजगी महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्याने एफआयआर दाखल केल्यानंतर गोपालपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी इतर तीन महिलांसोबत एका खाजगी हॉस्टेलमध्ये राहत होती आणि रविवारी, राजा उत्सवानिमित्त, ती तिच्या प्रियकरासह समुद्रकिनाऱ्यावर गेली होती.

फोटो व्हायरल करण्याची धमकी

तक्रारीनुसार, ते एका निर्जन ठिकाणी बसले होते तेव्हा ३ मोटारसायकलींवर १० तरुणांचा एक ग्रुप आला. त्यांनी तिच्या प्रियकराला पकडले, त्यानंतर त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या नराधमांनी आधी त्या तरुण आणि तरुणीचे फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयावरून सात जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेत घेतलेले सर्व लोक प्रौढ आहेत आणि आम्ही त्यांची विविध मुद्द्यांवर चौकशी करत आहोत.'

Web Title: First, they threatened to take a photo and make it viral men gang sexual assult young woman in front of her boyfriend