आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:36 IST2025-05-02T10:22:05+5:302025-05-02T10:36:33+5:30

Crime news: २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या बॉयफ्रेंडच्या घरात आढळून आला. तरुणीच्या बहिणीने या घटनेबद्दल अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 

First there was a scream, then a body was found; What happened to the young woman in her boyfriend's house? | आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?

आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?

एका २४ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्या बॉयफ्रेंडच्या घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनौमधील महानगरमध्ये घडली आहे. मयत तरुणीच्या कुटुंबीयांना आरोप केला आहे की, बॉयफ्रेंडने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणात हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीने आरोपी बॉयफ्रेंडबद्दल खळबळजनक दावे केले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मयत तरुणीच्या बहिणीने आरोपी तरुण पवनवर गंभीर आरोप केले आहेत. मृत्यू झालेल्या तरुणीच्या बहिणीने सांगितले की, आरोपी तिला बळजबरीने त्याच्या भीखमपूर येथील घरी घेऊन गेला होता. त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि विरोध करते म्हणून तिची हत्या केली. 

वाचा >>इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

तो तिला बळजबरी सोबत घेऊन गेला

'बुधवारी सायंकाळी ४ वाजता माझ्या बहिणीचा बॉयफ्रेंड पवन दुकानात आला होता. तो मला म्हणाला की तिच्यासोबत भांडण झालं आहे. ती माझ्याशी भांडतेय. त्यानंतर तो माझ्या बहिणीला बळजबरी सोबत घेऊन गेला', असे मयत तरुणीच्या बहिणीने सांगितले. 

खोलीतून आला ओरडण्याचा आवाज

'मी जेव्हा भीखमपूर येथील पवनच्या घरी गेले, तेव्हा मुख्य दरवाजा उघडाच होता, पण जाळीचा दरवाजा बंद होता. घरातून तिच्या ओरडण्याचा आवाज येत होता. नंतर डोकावून पाहिले तर ती बेडवर पडलेली होती. त्यानंतर मी पवनला म्हणाले की, तिला रुग्णालयात घेऊन जाऊ. त्यावर त्याने नकार दिला. सोबत येत असतानाच तो गोमती नदीच्या काठावरून पळून गेला', असे मयत तरुणीच्या बहिणीने सांगितले. 

पोलिसांनी सुरू केला तपास

मयत तरुणीचे वडील म्हणाले, 'पवन आणि माझी मुलगी महाविद्यालयात असल्यापासून मित्र होते. मला शंका आहे की पवनने तिच्यावर आधी बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली.'

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आता बलात्कार आणि हत्या केल्याच्या कलमांचाही समावेश केला आहे. घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर बलात्कार आणि हत्या कशाने केली याची माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: First there was a scream, then a body was found; What happened to the young woman in her boyfriend's house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.