Crime news: पोलिसांनी एका शिक्षिकेला अटक केली. एका विद्यार्थिनीच्या वडिलांसोबत तिचे प्रेमसंबंध होते. दोघांचे शरीरसंबंधही झाले. पण, प्रकरण तेव्हा बिनसले जेव्हा शिक्षिकेने याचेच व्हिडीओ आणि फोटो दाखवून ब्लॅकमेल करणं सुरू केलं. ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. शिक्षिकेसह पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे ज्यांचा यात सहभाग आहे. शिक्षिकेचा हा कारनामा समोर आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने ही कारवाई केली. २५ वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी बरोबरच पोलिसांनी गणेश काळे (वय ३८) आणि सागर (वय २८) यांना अटक केली. या तिघांनी ब्लॅकमेल करून तक्रारदाराकडून (विद्यार्थीच्या वडिलांकडून) चार लाख रुपये घेतले, असा आरोप आहे.
शिक्षिका आणि तक्रार कसे भेटले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगळुरूमध्ये पत्नी आणि तीन मुलीसह तक्रारदार राहत होता. तक्रारदार व्यवसाय करतो. त्याची सर्वात छोटी मुलगी पाच वर्षांची आहे. २०२३ मध्ये तिचा शाळेत प्रवेश घेण्यासाठी तक्रारदार गेला होता. त्यावेळी त्याची शिक्षिका श्रीदेवी रुदागीसोबत ओळख झाली.
बोलणं वाढलं अन् दोघेही आले जवळ
तक्रारीनुसार, प्रवेश प्रक्रियेदरम्यान ओळख झाल्यानंतर शिक्षिका श्रीदेवी रुदागी नंतरही तक्रारदार व्यक्तीच्या संपर्कात होती. ती कॉल आणि मेसेज करायची. नंतर ती व्हिडीओ कॉल करू लागली.
वाचा >>आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात काय?
हळू हळू दोघांमधील बोलणं वाढलं. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दोघाचे संबंध आल्यानंतर श्रीदेवीने तक्रारदार व्यक्तीकडे १५ लाख रुपये मागितले.
शिक्षिका गेली तक्रारदार व्यक्तीच्या घरी
तक्रारदार व्यक्तीने १५ लाख देण्यास नकार दिल्यानंतर आरोपी शिक्षिका ५० हजार रुपये उसने घेण्याच्या बहाण्याने थेट त्याच्या घरी गेली. दरम्यान, व्यवसायातील कमाई घटली. त्यामुळे तक्रारदाराने पत्नी आणि मुलींना परत गुजरातमधील गावी पाठवण्याचे ठरवले.
त्यामुळे मुलीच्या शाळेचा दाखला हवा होता. मार्च महिन्याच्या सुरूवातीला हे घडले. जेव्हा तक्रारदार व्यक्ती शाळेत गेला, तेव्हा तिथे श्रीदेवी रुदागीच्या कार्यालयात काळे आणि सागर आधीपासूनच हजर होते.
त्यांनी तक्रारदाराला श्रीदेवीसोबतचे त्याचे ते व्हिडीओ आणि फोटो दाखवले. त्यानंतर त्यांनी २० लाख रुपये मागितले. पैसे दिले नाही, तर हे व्हिडीओ आणि फोटो कुटुंबाला दाखवू अशी धमकीही दिली. त्यानंतर १५ लाख देण्याचे ठरले.
त्यानंतर १.९ लाख सुरूवातीला दिले. त्यानंतर त्यांची मागणी वाढली. १७ मार्च रोजी श्रीदेवी रुदागीने तक्रारदाराला कॉल केला आणि म्हणाली की, ५ लाख रुपये माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी, काळे आणि सागरसाठी प्रत्येकी एक लाख रुपये आणि इतर ८ लाख रुपये असे एकत्रित सगळे पैसे पाठव.
त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांना कॉल केला. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांनी तिघांना अटक केली. तिघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.