मावळातील वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:36 IST2019-07-23T12:35:30+5:302019-07-23T12:36:33+5:30

वेहेरगाव मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर पिस्तुलीने गोळी झाडत प्राणघातक हल्ला करण्यात आला.

Firing on youth for unknown reson in Vehergaon at maval | मावळातील वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार 

मावळातील वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार 

लोणावळा : वेहेरगाव मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर पिस्तुलीने गोळी झाडत प्राणघातक हल्ला करण्यात आला.मंथन सातकर (रा. कान्हे, मावळ) हा युवक या हल्ल्यात जखमी झाला असून त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. कामशेत येथील शिंदे नामक युवकाने हा गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांच्या हाती मिळाली आहे. वेहेरगाव येथील तुरे लॉज याठिकाणी सदरचा हल्ला झाला. घटनेची माहिती समजताच लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, कामशेतचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाकडे धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधिक्षक विवेक पाटील व लोणावळा उपविभागाचे प्रभारी पोलीस अधिकारी टोम्पे यांनी घटनास्थळाला भेट देत प्रकरणाचा आढावा घेतला.

Web Title: Firing on youth for unknown reson in Vehergaon at maval